Relaince Jio हे देशातील सर्वात मोठे नेटवर्क असलेली कंपनी आहे. जिओचे देशभरात सार्वधिक ग्राहक आहेत. जिओ ५ जी सर्व्हिस देशभरातील १८४ पेक्षा जास्त शहरांमध्ये सुरु झाली आहे. जिओ आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च करत असते. आतासुद्धा जिओने आपल्या ग्राहकांसाठी १.५ जीबी डेली डेटा देणारे काही प्लॅन्स आणले आहेत. तर डेली १.५ जीबी डेटा देणारे प्रीपेड प्लॅन कोणते आहेत ते जाणून घेऊयात.
सर्वात स्वस्त असणारा जीओचा प्रीपेड प्लॅन हा ११९ रुपयांचा आहे. यामध्ये वापरकर्त्यांना १.५ जीबी डेटा वापरायला मिळणार आहे. यामध्ये १४ दिवसांची वैधता मिळते. तर पूर्ण महिन्यामध्ये ३०० एसएमएस तुम्हाला यामध्ये करता येणार आहेत. सर्वात स्वस्त असणारा जीओचा प्रीपेड प्लॅन हा ११९ रुपयांचा आहे. यामध्ये वापरकर्त्यांना १.५ जीबी डेटा वापरायला मिळणार आहे. यामध्ये १४ दिवसांची वैधता मिळते. तर पूर्ण महिन्यामध्ये ३०० एसएमएस तुम्हाला यामध्ये करता येणार आहेत. यामध्ये Jio tv , JIo Cinema , jio cloud आणि jio security या सुविधा वापरकर्त्यांना मिळणार आहेत.
हेही वाचा : Jio Recharge Plan: जिओने आणला तीन महिन्यांच्या वैधतेचा सर्वात स्वस्त प्लॅन; जाणून घ्या
२३९ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन
जिओचा २३९ रुपयांचा प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना २८ दिवसांची वैधता मिळते. याव्यतिरिक्त वापरकर्त्यांना अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि दररोज १०० एसएमएस करता येणार आहेत. तसेच जिओच्या २५९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये देखील तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग , दररोज १०० एसएमएस असे फायदे मिळणार असून याची वैधता एका महिन्यासाठी असणार आहे.
जिओ ने कापल्या ग्राहकांसाठी ४७९ रुपयांचा एक प्रीपेड प्लॅन आणला आहे. यामध्ये वापरकर्त्यांना दररोज १.५ जीबी डेटा वापरायला मिळणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस करता येणार असून याची वैधता ५६ दिवसांसाठी असणार आहे. यामध्ये तुम्हाला Jio TV, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security च्या सुविधाही मोफत मिळणार आहेत.
हेही वाचा : Tech Layoff मध्ये TCS च्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; नोकरी तर जाणार नाहीच पण…
६६६ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग उपलब्ध असणार आहे. तसेच दररोज १.५ जीबी डेटा मिळणार असून या प्लॅनची वैधता ही ८४ दिवसांची असणार आहे. यासोबतच तुम्हाला यामध्ये Jio TV, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security च्या सुविधाही मोफत मिळणार आहेत.