रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी दोन नवीन रिचार्ज प्लान लाँच केले आहेत. कंपनीने वर्क फ्रॉम होमसाठी दोन्ही प्लान सादर केले आहेत. या प्लानची किंमत २,८७८ रुपये आणि २,९९८ रुपये आहे. विशेष म्हणजे यामध्ये वर्षभरासाठी २ जीबी आणि २.५ जीबी डेटा मिळणार आहे. दोन्ही प्लान कंपनीच्या वेबसाइटवर अपडेट करण्यात आले आहेत. चला अधिक तपशील जाणून घेऊयात
जिओचा २,८७८ रुपयांचा वर्क फ्रॉम होम प्लान: जिओच्या नवीन २,९९८ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसह वापरकर्त्यांना ३६५ दिवसांसाठी दररोज २.५ जीबी डेटा दिला जाईल. म्हणजेच एका वर्षात तुम्हाला एकूण ९१२.५ जीबी डेटा मिळेल. एकदा डेटा मर्यादा संपली की, स्पीड ६४ केबीपीएसपर्यंत घसरेल. हा वर्क फ्रॉम होम डेटा प्लान असल्याने व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएससारखे फायदे मिळत नाहीत.
जिओचा २,८७८ रुपयांचा वर्क फ्रॉम होम प्लान: रिलायन्स जिओचा २,८७८ रुपयांचा प्रीपेड प्लॅन ग्राहकांना ३६५ दिवसांसाठी दररोज २ जीबी डेटा देणार आहे. म्हणजेच या प्लानमध्ये तुम्हाला एकूण ७३० जीबी डेटा मिळेल. एकदा डेटा मर्यादा संपली की, स्पीड ६४ केबीपीएसपर्यंत घसरेल. हा वर्क फ्रॉम होम डेटा प्लान असल्याने व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएससारखे फायदे मिळत नाहीत.
दमदार कॅमेरा आणि 6000 mah बॅटरी असलेला Redmi 10 स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
जिओचे इतर वर्क फ्रॉम प्लान: वरील दोन प्लान व्यतिरिक्त कंपनी आणखी तीन प्लान आहेत. कंपनीकडे १८१ रुपये, २४१ रुपये आणि ३०१ रुपयांचा वर्क फ्रॉम होम प्लान आहे. हे तिन्ही प्लान ३० दिवसांच्या वैधतेसह येतात. १८१ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना ३० जीबी, २४१ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना ४० जीबी आणि ३०१ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना ५० जीबी डेटा दिला जातो.