रिलायन्स जिओने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन प्लॅन लॉन्च केला आहे. ज्यामध्ये वापरकर्त्यांना प्राइम व्हिडीओचे सबस्क्रिप्शन मिळणार आहे. रिलायन्स जिओ देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. देशामध्ये जिओने सर्वात पहिल्यांदा ५ जी नेटवर्क सुरू केले आहे. २०२३ च्या अखेरपर्यंत देशाच्या प्रत्येक भागामध्ये ५ जी नेटवर्क सुरु करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्लॅनमध्ये प्राइम व्हिडीओसह आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे फायदे मिळणार आहेत. तसेच अन्य कोणकोणते फायदे मिळणार आहेत, त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
रिलायन्स जिओ आपल्या प्लॅन्समध्ये अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मचे फायदे ऑफर करत असतो. आता जिओने ओटीटी फायद्यांसह एक नवीन वार्षिक प्लॅन लॉन्च केला आहे. जिओ नेटफ्लिक्स, डिस्नी + हॉटस्टार, सोनी लिव्ह प्लॅन, झी ५ चा प्लॅन आणि झी ५ – सोनी लिव्ह कॉम्बो प्लॅनसह बंडल केलेले अनेक प्लॅन ऑफर करत असते. आता एक नवीन प्लॅन लॉन्च झाला आहे त्यामध्ये वापरकर्त्यांना प्राइम व्हिडीओचे मोबाइलचा फायदा मिळणार आहे. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.
रिलायन्स जिओचा प्राइम व्हिडीओसह वार्षिक प्लॅन
रिलायन्स जिओने ३,२२७ रुपयांचा एक नवीन वार्षिक प्लॅन लॉन्च केला आहे. यामध्ये वापरकर्त्यांना दररोज २ जीबी डेटा ऑफर केला जाणार आहे. तसेच दिवसाचा डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड हा ६४ kbps इतका होईल. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस करण्याचे फायदे मिळणार आहेत. या प्लॅनची वैधता ३६५ दिवस इतकी आहे. तसेच यामध्ये तुम्हाला प्राइम व्हिडीओचे मोबाइल व्ह्ह्र्जन वापरता येईल. तसेच जीओटीव्ही, जिओसिनेमा आणि जिओक्लाऊड सारख्या बंडल सेवांचा समावेश या प्लॅनमध्ये आहे. तसेच प्लॅनमध्ये अतिरिक्त ट्रू ५ जी डेटाचा समावेश आहे. याचा वापर ज्या ठिकाणी ५ जी नेटवर्क उपलब्ध आहे तिथे करता येणार आहे.