Reliance Jio 5G Service: भारत सध्या Rilance Jio , Airtel आणि VI म्हणजेच वोडाफोन-आयडिया या प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. रिलायन्स जिओ आणि एअरटेल या टेलिकॉम कंपन्यांनी आपली ५ जी सेवा भारतामध्ये सुरु केलेली आहे. यामध्ये रिलायन्स जिओ कंपनी सर्वात आघाडीवर आहे. देशातील अनेक शहरांमध्ये जिओची ५ जी सेवा सुरु झाली आहे. रिलायन्स जिओने देशभरातील २७ शहरांमध्ये आपली ५जी सेवा सुरु केली आहे.
या ५ जी सेवेमध्ये महाराष्ट्रातील एका शहराचा समावेश आहे. आज सुरु झालेल्या सेवेमध्ये राज्यातील सातारा शहराचा समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील १७ शहरांमध्ये जीओची ५ जी सेवा सुरु झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील अकोला, परभणी, अहमदनगर, अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड-वाघाळा, नाशिक, पुणे, सांगली आणि सोलापूर व सातारा अशा एकूण १७ शहरांमध्ये रिलायन्स जीओची ५ जी सेवा सुरु झाली आहे.
तर देशातील आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर , छत्तीसगड, कर्नाटक , केरळ , मध्य प्रदेश, महाराष्ट्र , पंजाब, तेलंगणा , तामिळनाडू , उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड व पश्चिम बंगाल या राज्यांमधील २७ शहरांमध्ये ५ जी सेवा जिओने सुरु केली आहे. बुधवारपासून या २७ शहरांमधील रिलायन्स जिओ वापरकर्त्यांना कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय Jio वेलकम ओफर अंतर्गत १ Gbps या स्पीडने अनलिमिटेड डेटा वापरता येणार आहे. कामपणीच्या प्रत्येक वापरकर्त्याने Jio True ५ जी सेवेचा लाभ घ्यावा अशी आमची इच्छा असल्याचे रिलायन्स जिओच्या प्रवक्त्याने सांगितले. या वर्षाच्या अखेरीस प्रत्येक शहरांत आणि गावात ५ जी सेवा सुरु करण्याचे जीओचे लक्ष्य आहे.