Reliance Jio ने 4G फोन ‘Jio Bharat V2’ लॉन्च केला आहे. ‘Jio Bharat V2’ अतिशय वाजवी दरात उपलब्ध करुन देण्यात आला आहे. रिलायन्स जिओने जगातला सर्वात स्वस्त 4जी मोबाईल लॉन्च केला आहे. या फोनमध्ये वापरकर्त्यांना JioPay सह UPI, Jio Saavn, JioCinema आणि अन्य काही फीचर्स मिळणार आहेत. तथापि ,रिलायन्स जिओने Jio Bharat फोन वापरकर्त्यांसाठी काही बेसिक रिचार्ज प्लॅन सुरू केले आहेत. ‘Jio Bharat V2’ ची किंमत९९९ रुपये ठेवण्यात आली आहे.  हे प्लॅन्स कोणकोणते आहेत आणि यामध्ये कोणते फायदे मिळणार आहेत हे जाणून घेऊयात.

जिओने Jio भारत वापरकर्त्यांसाठी १२३ रुपये आणि १,२३४ रुपयांचे दोन नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स सादर केले आहेत. नवीन प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि इंटरनेट डेटा ऑफर करतात. तसेच नवीन ४जी फोनच्या विक्रीला चालना देण्यासाठी आणि भारतातील २५० दशलक्ष फिचर फोन वापरकर्त्यांना “डिजिटल स्वातंत्र्य” (Digital freedom) ऑफर करण्यासाठी तयार केले गेले आहेत. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

Flight Attedent
Delta Airline : “योग्य अंतर्वस्त्रे परिधान करा”, फ्लाईट अटेंडंटना विमान कंपनीकडून तंबी!
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Yamaha R15M Carbon Fibre launched
२००८ पासून मार्केट गाजवणारी Yamaha आता नव्या अवतारात दाखल; किंमत पूर्वीपेक्षा कमी, तर इंजिनचंही बदललं रूप
sarva karyeshu sarvada 2024 pune sarvajanik sabha work for modernization of old documents
सर्वकार्येषु सर्वदा : दीड शतकाच्या दस्तावेजांना आधुनिकीकरणाचा साज
Trade Connect, trade, Online Forum,
व्यापाराशी निगडित माहितीसाठी ‘ट्रेड कनेक्ट’, केंद्राकडून आयात-निर्यातदारांसाठी ऑनलाइन मंच
sarva karyeshu sarvada sane guruji rashtriy smarak trust information in marathi
सर्वकार्येषु सर्वदा : युवकांना घडवण्याचा उपक्रम, विस्तारासाठी मदत आवश्यक
Best Selling Electric Scooter
Activa, Jupiter नव्हे तर देशातील बाजारात ‘या’ कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटरची तुफान विक्री; खरेदी करण्यासाठी ग्राहकांची शोरूम्सवर गर्दी
Tata Curvv Ev Waiting Periods Extended From 14 Days To 56 Days After Launch Tata Curvv EV
Tata Curvv EV: ही नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यासाठी तुटून पडले ग्राहक; लाँचिंगनंतर वेटिंग पीरियड पोहचला चक्क ५६ दिवसांवर

हेही वाचा : OnePlus आज Nord 3 सह लॉन्च ‘हे’ भन्नाट प्रॉडक्ट्स लॉन्च करणार; कुठे पाहता येणार लाईव्ह इव्हेंट ?

जिओ भारतचा १२३ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

रिलायन्स जिओच्या भारत १२३ रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि एकूण १४ जीबी डेटा वापरायला मिळतो. रिचार्ज केल्याच्या तारखेपासून २८ दिवसांच्या वैधतेमध्ये वापरकर्त्यांना दररोज ०.५ जीबी डेटा मिळणार आहे. जिओने असा दावा केला की, हा प्लॅन अन्य ऑपरेटरच्या तुलनेमध्ये वापरकर्त्यांना ३० टक्क्यांपर्यंत बचत करण्याची परवानगी देते. याउलट इतर ऑपरेटर फक्त २ जीबी डेटासह व्हॉइस कॉलसाठी १७९ रुपयांचा प्लॅन ऑफर करतात.

जिओ भारतचा १,२३४ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जिओ भारतचा १,२३४ रुपयांचा प्लॅन हा वार्षिक प्लॅन आहे. यामध्ये वापरकर्त्यांना पूर्ण वर्षभर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगसह एकूण १६८ जीबी डेटा (०.५ जीबी दररोज ) मिळणार आहे. हा प्लॅन प्रतिस्पर्ध्यांपेक्षा ७ पट अधिक डेटा ऑफर करते असा जीओचा दावा आहे. म्हणजेच दररोजच्या डेटावर २५ टक्के बचत होते.

2G ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने २०१८ मध्ये Jio फोन देखील आणला होता. JioPhone आजही १३ कोटींहून अधिक ग्राहकांची पसंती आहे. कंपनीला ‘Jio Bharat V2’ कडूनही त्याच अपेक्षा आहेत. कंपनीने ७ जुलैपासून ‘Jio Bharat V2’ ची बीटा ट्रायल सुरू करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने ‘Jio Bharat V2’ ६,५०० तहसीलमध्ये नेण्याची योजना आखली आहे.