Jio Prima 4G: रिलायन्स जिओने भारतात आपला नवीन जिओफोन प्राइमा ४ जी(JioPhone Prima 4G) लॉन्च केला आहे. जिओने इंडियन मोबाइल काँग्रेस २०२३ मध्ये केला आहे. दिवाळीच्या जवळपास हा फोन ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. तथापि, हा फोन जिओमार्ट वेबसाइटवर लिस्टेड करण्यात आला आहे. रिलायन्स जिओ देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. देशामध्ये सर्वात पहिल्यांदा जिओने ५ जी नेटवर्क सुरु झाले आहे. जिओफोन प्राइमा ४जी एक प्रीमियम डिझाइन असणारा फिचर फोन आहे. या फोनच्या फीचर्सबद्दल, किंमतीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
जिओ प्राइमा ४ जी : किंमत आणि उपलब्धता
जिओ फोन प्राइमा ४ जी मध्ये ३२०x२४० पिक्सएलचे रिझोल्युशन देण्यात आले आहे. तसेच ग्राहकांना या फोनमध्ये २.४ इंचाचा TFT डिस्प्ले आहे. याशिवाय फोनमध्ये फ्लॅशलाइट आणि कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामध्ये ०.३ मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याचा समावेश आहे. हूड अंतर्गत, या जिओ फोनमध्ये ५१२ एमबीची रॅम देण्यात आली आहे. याचे स्टोरेज मायक्रोएसडीकार्डच्या मदतीने १२८ जीबी पर्यंत वाढवता येते. हा फोन KaiOS ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. यामध्ये ४ जी ARM Cortex A53 प्रोसेसरचा सपोर्ट देण्यात आला आहे. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.
हेही वाचा : Apple iPad: ‘या’ आयपॅडवर कंपनी देतेय ९ हजारांचा डिस्काउंट, काय आहेत फीचर्स?
कनेक्टिव्हिटीसाठी, जिओफोन प्राइमा ४जी मध्ये ब्लूटूथ ५.० देण्यात आले आहे. तसेच यामध्ये १८०० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच जिओफोन प्राइमा ४ जिओफोनमध्ये एफएम रेडिओची सुविधा देण्यात अली आहे. ज्यामध्ये ग्राहकांना त्यांच्या आवडत्या चॅनेल्सवरील आवडते कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे. फोनमध्ये जिओटीव्ही, जिओसिनेमा, जिओसिनेमा, जिओसावन आणि जिओन्यूज सारखे अॅप्स इन्स्टॉल केलेले असतात. जिओफोन प्राइमा ४जी एक प्रीमियम डिझाइन असणारा फिचर फोन आहे. यामध्ये युट्युब आणि व्हॉट्सअॅपचा सपोर्ट देण्यात आला आहे.
रिलायन्स जिओने भारतात जिओफोन प्राइमा ४ जी फोन लॉन्च केला आहे. यामध्ये कंपनीने युट्युब आणि व्हॉट्सअॅपचा सपोर्ट देण्यात आला आहे. या फोनची किंमत २,५९९ रुपये असणार आहे. हा फोन खरेदीदार जिओमार्टवरून खरेदी करू शकतात.