Reliance Jio ही देशातील एक लोकप्रिय कंपनी आहे. तसेच देशातील सर्वात आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. रिलायन्स जिओ भारतात नवीन JioBook लॅपटॉप लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. Amazon ने आपल्या वेबसाईटवर एक टीझर प्रकाशित केला आहे. टीझरनुसार हा लॅपटॉप ३१ जुलै रोजी लॉन्च होणार आहे असे लक्षात येते. हा लॅपटॉप गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लॉन्च करण्यात आलेल्या JioBook चे नवीन व्हर्जन असू शकते किंवा रिलायन्स जिओ कदाचित Amazon द्वारे जुनाच लॅपटॉप विक्रीसाठी आणण्याची योजना आखत असेल.
२०२२ जिओबुक लॅपटॉप फक्त रिलायन्स डिजिटल स्टोअर्सद्वारे उपलब्ध करून देण्यात आला होता. आत्तापर्यंत, कोणतीही स्पष्टता नाही कारण Amazon फक्त म्हणतो की “all-new JioBook” या महिन्याच्या अखेरीस लॉन्च होईल आणि ई-कॉमर्स साइटने डिव्हाइसची काही प्रमुख फीचर्स उघड केली आहे. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.
Amazon चा टिझर दर्शवते की, नवीन जिओबुक लॅपटॉपची डिझाइन गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लॉन्च करण्यात आलेल्या लॅपटॉपसारखेच असेल. हा लॅपटॉप कॉम्पॅक्ट फॉर्म फॅक्टरसह निळ्या रंगात येतो. लॅपटॉप ”सर्व वयोगटातील उत्पादकता, मनोरंजन आणि खेळासाठी डिझाइन केलेले आहे.” असा टीझरमध्ये दावा करण्यात आला आहे. तसेच नवीनतम जिओ लॅपटॉपचे डिझाइन अतिशय हलके आहे. ज्याचे वजन सुमारे ९९० ग्रॅम इतके आहे. Amazon नुसार, ते वापरकर्त्यांना पूर्ण दिसवभर बॅटरी लाइफ देऊ शकते. उर्वरित डिटेल्स सध्या उघड करण्यात आलेले नाहीत. ते डिटेल्स ३१ जुलै रोजी लॉन्च होण्यावेळी उघड होण्याची शक्यता आहे.
ज्यांचे बजेट मर्यादित आहे आणि ज्यांना ब्राउझिंग, शिक्षण आणि इतर गोष्टींसाठी लॅपटॉप हवा आहे. त्यांच्यासाठी जिओबुक २०२२ हा लॅपटॉप आहे. ऑक्टोबरमध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या JioBook मध्ये ११.६ इंचाचा HD डिस्प्ले आहे. व्हिडीओ कॉलिंगसाठी यामध्ये ब्रॉड बेझल आणि २ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तसेच यात Qualcomm Snapdragon 665 SoC चा सपोर्ट देण्यात आला आहे.
हेही वाचा : लवकरच Twitter ची चिमणी जाणार? एलॉन मस्क यांचे सूचक ट्वीट; म्हणाले…
तसेच यामध्ये २ जीबी रॅम मिळते. म्हणजे यावर मल्टी-टास्किंग नीट होणार नाही. हे ३२ जीबी eMMC स्टोरेजसह ऑफर केले जात आहे जे १२८ जीबीपर्यंत वाढवता येते. जिओ लॅपटॉप JioOS वर चालतो. तसेच यामध्ये एक जिओ स्टोअरदेखील आहे ज्यात लोकांना कोणतेही थर्ड पार्टी Apps इन्स्टॉल करण्याची परवानगी मिळते. या लॅपटॉपमध्ये हूड अंतर्गत ५००० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. एकदा चार्ज केल्यास ८ तास बॅटरी टिकते असा कंपनीचा दावा आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी यात 3.5 मिमी ऑडिओ जॅक, ब्लूटूथ 5.0, HDMI मिनी, वाय-फाय आणि बरेच काही मिळते. हे डिव्हाइस एम्बेडेड Jio सिम कार्डसह येते, जे लोकांना Jio 4G LTE कनेक्टिव्हिटी सक्षम करण्यास परवानगी देते. हा जिओ लॅपटॉप भारतात २०, ००० रुपयांना लॉन्च करण्यात आला होता.