Reliance Jio ही देशातील सर्वात मोठे ५ जी नेटवर्क असणारी टेलिकॉम कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च करत असते. सध्या देशामध्ये अनेक शहरांत जीओचे ५ जी नेटवर्क सुरु झाले असून, या वर्षाअखेरपर्यंत संपूर्ण देशभरात ५ जी नेटवक सुरू करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. रिलायन्स जिओने 5G लॉन्च करण्यापूर्वी भारतीय बाजारपेठेसाठी काही रोमांचक घोषणा केल्या होत्या. Jio ने सांगितले की ते Jio AirFiber नावाचे नवीन 5G FWA (फिक्स्ड-वायरलेस एक्सेस) डिव्हाइस आणतील, जे वापरकर्त्यांसाठी हाय स्पीड आणि सर्व्हिस देतील.

Jio AirFiber पारंपारिक ब्रॉडबँड प्रमाणे असेल. मात्र, ते कसे चालेल, हे सांगण्यात आलेले नाही. रिलायन्स जिओने इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC) 2022 मध्ये हे प्रॉडक्ट सादर केले होते. या कार्यक्रमात, ते कसे कार्य करेल हे कंपनीने सांगितले नाही. या उत्पादनाचा वापर करून संपूर्ण घरामध्ये हाय स्पीडचा वापर करता येईल . तसेच Jio चे 5G नेटवर्क त्याच्यासोबत काम करेल.

Fair Play Betting App, IPL Broadcast , ED ,
फेअर प्ले बेटिंग अ‍ॅप आयपीएल बेकायदा प्रक्षेपण प्रकरण: ईडीकडून आतापर्यंत ३३५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Monopole erection to keep power system running smoothly
वीजयंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी मोनोपोल
pune video
“चला गोल फिरा..” ही पुणेरी पाटी कशासाठी? Video होतोय व्हायरल
honda and nissan merging plan
बड्या जपानी मोटारकंपनीला घरघर… होंडा-निस्सानने विलिनीकरणचा पर्याय का निवडला?
Zee Marathi Lakshmi Niwas Serial New Entry
Video : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री! साकारणार ‘ही’ भूमिका, जबरदस्त प्रोमो आला समोर
Shiva
Video : “मी आता अंधाराला…”, आशू-शिवामधील गैरसमज दूर करण्यासाठी पाना गँगची युक्ती; पाहा प्रोमो
Dolly Chaiwala has opened a new office in Dubai. A video shows him working on his laptop in this luxurious space video viral
VIDEO: दहावीनंतर शाळा सोडली आणि चहाची टपरी सुरू केली, ते आज थेट दुबईत इंट्री; ऑफिस पाहून थक्क व्हाल

हेही वाचा : चीन लवकरच टेलिकॉम क्षेत्रात नवीन पाऊल टाकणार? ‘या’ निर्णयामुळे अमेरिकेची वाढली चिंता

Jio AirFiber ठरणार गेम चेंजर

Jio AirFiber हे गेम चेंजर प्रॉडक्ट ठरणार आहे. आता कंपनी त्याचे मार्केटिंग कसे करणार हे पाहायचे बाकी आहे. एका अहवालानुसार रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे अध्यक्ष किरण थॉमस यांनी सांगितले, या उत्पादनाला लवकरच स्वतःचे स्थान मिळेल. २०२३ या वर्षाच्या अखेरपर्यंत आम्ही वापरकर्त्यांच्या घरामध्ये Jio AirFiber पाहू शकतो. जिओ एअरफायबर हे ५ जी चा लाभ घेण्यासाठी मदतशीर ठरू शकते. यामुळे रिलायन्स ५ जी च्या रोलआऊटला अजून गती देऊ शकते.

लवकरच लॉन्च होणार जिओ एअर फायबर (Image Credit-Financial Express)

हेही वाचा : Tech Layoffs: पगारवाढ कसली घेऊन बसलात? ‘या’ कंपनीत दुसऱ्यांदा होणार तब्बल ४ हजार कर्मचाऱ्यांची कपात; जाणून घ्या

प्रॉडक्टच्या व्यावसायिक किंमती अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. लॉन्चपूर्वी त्यांची घोषणा केली जाईल. रिलायन्स जिओने JioFiber सेवेसह लाखो घरांमध्ये आधीच आपले स्थान निर्माण केले आहे. जर का जिओ एअर फायबर आले तर त्याच्यात आणि जिओ फायबरमध्ये स्पर्धा पाहायला मिळेल. Jio AirFiber हे कॉम्पॅक्ट डिव्हाइस आहे आणि ते १००० स्केवर फूट परिसरामध्ये वाय-फाय कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यास सक्षम असेल.

Story img Loader