रिलायन्स जिओ देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. जिओने देशात सर्वात पहिले ५ जी नेटवर्क सुरू केले आहे. आज देशातील अनेक शहरांमध्ये जिओ ग्राहक ५जी सेवेचा लाभ घेत आहेत. तसेच कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन्स लॉन्च करतच असते.जिओ कंपनी Netflix बंडल प्रीपेड प्लॅन्स लॉन्च करणारी पहिली कंपनी ठरलीआहे. हे प्लॅन्स लॉन्च होण्यापूर्वी देखील तुम्हाला जिओ पोस्टपेड मोबाइल आणि फायबर ब्रॉडबँड प्लॅनसह नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन विनामूल्य मिळवू शकता. आज आपण जिओचे बंडल नेटफ्लिक्स प्रीपेड प्लॅन्स कोणते आहेत आणि त्याची किंमत व वैधता किती आहे हे जाणून घेऊयात.
जिओने दोन प्लॅन्स लॉन्च केले असून आता आपल्या प्रीपेड मोबाइल ग्राहकांना नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन मोफत मिळवण्याची संधी देखील देणार आहे. नेटफ्लिक्स हे जागतिक स्तरावरील एक लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. मात्र भारतीय बाजारपेठेत हे थोडेसे महाग आहे. आता जर का तुम्ही जिओचे प्रीपेड ग्राहक असाल तर अतिरिक्त किंमतीशिवाय या प्लॅटफॉर्मचा आनंद घेऊ शकणार आहेत. जाणून घेऊयात या दोन नवीन प्रीपेड प्लॅन्सविषयी. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.
हेही वाचा : WhatsApp नवीन फिचर आणणार; वापरकर्त्यांना AI च्या मदतीने तयार करता येणार स्टिकर्स
जिओचा १,०९९ रूपयांचा प्लॅन
जिओने दोन बंडल प्लॅन्स लॉन्च केले असून त्यातील पहिला प्लॅन हा १,०९९ रुपयांचा आहे. यात ग्राहकांना दररोज २ जीबी डेटा,५ जी वेलकम ऑफर अंतर्गत अनलिमिटेड ५ जी डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, र्रोज १०० एसएमएस आणि जिओ Apps चे फायदे मिळतात. या प्लॅनची वैधता ८४ दिवसांची आहे. या प्लॅनसह, वापरकर्त्यांना Netflix Mobile चे मोफत सबस्क्रिप्शन मिळणार आहे.
जिओचा १,४९९ रूपयांचा प्लॅन
१,४९९ रूपयांचा बंडल प्लॅन जिओने लॉन्च केला आहे. यात ग्राहकांना ८४ दिवसांची वैधता मिळते. ३ जीबी दररोजचा डेटा,अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, ५ जी वेलकम ऑफर अंतर्गत अनलिमिटेड ५ जी डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, र्रोज १०० एसएमएस आणि जिओ Apps चे फायदे मिळतात. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना कोणत्याही अतिरिक्त किंमतीशिवाय नेटफ्लिक्सच्या बेसिक सबस्क्रिप्शनमध्ये प्रवेश मिळणार आहे.