Valentine Day: फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमाचा महिना. प्रेमात पडलेले आणि प्रेमात पडू इच्छिणारे असे सगळेचजण या महिन्याची आतुरतेनं वाट पाहात असतात. कारण हा प्रेम व्यक्त करण्याचा महिना आहे. १४ फेब्रुवारीला जगभरात व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) साजरा केला जातो. सोशल मीडियामुळे हल्ली व्हॅलेंटाईन डे ची क्रेझ खूप वाढली आहे. व्हॅलेन्टाईन डे साठी देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन ऑफर आणली आहे. व्हॅलेंटाईन डे निमित्त रिलायन्स जिओ ने आपल्या ग्राहकांसाठी काय स्पेशल ऑफर आणली आहे ते जाणून घेऊयात.
देशातील १८४ शहरांमध्ये सध्या जिओ ५जी सर्व्हिस सुरु झाली आहे. जिओ ने आकर्षक प्लॅन्स लॉन्च केल्यामुळे जिओ ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याच कंपनीने व्हॅलेंटाईन डे निमित्त ग्रहकांसाठी अतिरिक्त डेटा , त्याशिवाय अनेक फायदे जाहीर केले आहे. त्याशिवाय जिओ वापरकर्त्यांना गिफ्ट्स आणि खाद्यपदार्थ ऑर्डर करण्यासाठी डिस्काउंट कूपन सुद्धा देत आहे.
हेही वाचा : VI Valentine Offer: ५ जीबी डेटासह मिळणार ५००० रुपयांचा कॅशबॅक, मग करा फक्त ‘हे’ काम
व्हॅलेंटाईन डे च्या ऑफरमध्ये Jio चार अतिरिक्त फायदे ग्राहकांना देत आहे. जिओच्या ग्राहकांना १२ जीबी ४ जी डेटा वापरायला मिळणार आहे. तेच Ixigo वर ४,५०० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या विमान तिकिटावर ७५० रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. तसेच Ferns आणि Petals वरून किमान ७९९ रुपयांच्या खरेदीवर १५० रुपयांचा डिस्काउंट जिओ देत आहे. McDonald मध्ये जर तुम्ही १९९ रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे खाद्यपदार्थ खरेदी केल्यास तुम्हाला १०५ रुपयांचे बर्गर मोफत मिळणार आहे.
Jio व्हॅलेंटाईन डे ऑफर प्लॅन
रिलायन्स जिओची व्हॅलेंटाईन डे च्या ऑफर २४९, ८९९ आणि २,९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये उपलब्ध असणार आहे. मात्र हे सर्व फायदे १० फेब्रुवारीनंतर रिचार्ज केल्यानंतरच ग्राहकांना मिळणार आहेत. रिचार्जच्या ७२ तासांच्या आतमध्ये कुपन कोड my jio अॅप मध्ये जमा होणार आहे. हा कूपन कोड ३० दिवसांसाठी वैध असणार आहे.
अतिरिक्त १२ जीबी ४ जी डेटा मिळविण्यासाठी वापरकर्त्यांना MyJio अॅपमधील व्हाउचर टॅबमध्ये क्लिक करावे लागेल. तुम्हाला मिळणाऱ्या अतिरिक्त डेटाची वैधता तुमच्या चालू असलेल्या प्लॅनप्रमाणेच असणार आहे.
जर का तुम्हाला तुमच्या विमानाच्या बुकिंगवर ७५० रुपयांचा डिस्काउंट हवा असेल तर MyJio अॅपमधील कूपन आणि विनिंग्स टॅबवर जाऊन कूपन कोडचा तपशील तपासावा लागणार आहे.यानंतर तुम्हाला Ixigo अॅपवर डिस्काउंट मिळू शकतो.