Jio Recharge plans List In Marathi : रिलायन्स जिओकडून युजर्सच्या विविध गरजा पूर्ण करणाऱ्या प्रीपेड मोबाईल प्लॅन्स ऑफर केले जात असतात. त्यामध्ये स्मॉल व्हॅलिडिटी प्लॅन्स, वार्षिक प्लॅन्स, मिड इयर प्लॅन्सचा समावेश असतो. ज्या युजर्सना एक महिन्याचा किंवा वार्षिक प्लॅन नको असेल त्यांच्यासाठी मिड इयर प्लॅन्स उपलब्ध असतात. त्यामध्ये कमी कालावधीचे प्लॅन्स असतात. तर यासाठी जिओने दोन नवीन प्रीपेड प्लॅन (Jio Recharge Plans) सादर केले आहेत, ज्यांच्या किमती १०२८ व १०२९ रुपये अशा आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टेलिकॉम किमतीत सरासरी १५ टक्क्यांनी वाढ होत असली तरीही जिओकडून नवीन प्लॅन्ससाठी अनेक गोष्टी ऑफर केल्या जात आहेत. जे युजर्स दीर्घकालीन डेटा, अमर्यादित कॉल्स, अतिरिक्त फायदे देणारे रिचार्ज शोधत आहेत, त्यांच्यासाठी हा प्लॅन बेस्ट आहे.या दोन्ही प्लॅन्समध्ये काय ऑफर्स आहेत ते चला पाहू…

१०२८ चा रिचार्ज प्लॅन (Jio Recharge Plans)

१०२८ रुपयांचा जिओ मोबाइल प्रीपेड प्लॅन (Jio Recharge Plans) ८४ दिवसांसाठी वैध असेल. त्यामध्ये अमर्यादित व्हॉइस कॉल, दररोज १०० एसएमएस दिले जाणार आहेत. या योजनेमध्ये दररोज तुम्हाला २जीबी डेटा म्हणजे पूर्ण पॅकमध्ये तुम्हाला एकूण १६८जीबी डेटा दिला जाईल. या योजनेची सर्वांत विशेष बाब म्हणजे जिओच्या ५जी नेटवर्कच्या क्षेत्रांमध्ये तुम्हाला अनलिमिटेड ५जी डेटा उपलब्ध असेल आणि त्यामुळे तुम्ही युजर्स ब्राउजिंग, स्ट्रीमिंग, डाउनलोडिंगसाठी हाय स्पीड इंटरनेटचा लाभ घेऊ शकता.

हेही वाचा…वॉशिंग मशीन, टीव्हीवर सूट तर क्रेडिट कार्डवर कॅशबॅक; वाचा फ्लिपकार्टच्या Big Shopping Utsav मध्ये काय असणार खास?

याव्यतिरिक्त हा प्लॅन युजर्ससाठी मोफत स्विगी वन लाइट मेंबरशिप देतो आणि मनोरंजनासाठी जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाऊड या ॲपमध्ये मोफत प्रवेश मिळवून देतो. त्यामुळे युजर्स टीव्ही शो, सिनेमा आणि महत्त्वाच्या फाइल्स, फोटो क्लाउडमध्ये इम्पोर्ट करू शकतात.

१०२९ चा रिचार्ज प्लॅन (Jio Recharge Plans)

१०२९ रुपयांच्या प्लॅनमध्ये १०२८ सारखेच फायदे दिले जातील. म्हणजे अमर्यादित कॉलिंग, दररोज १०० एसएमएस, ८४ दिवसांच्या कालावधीसाठी २जीबी दैनिक डेटा म्हणजे पूर्ण पॅकमध्ये तुम्हाला एकूण १६८जीबी डेटा, तर ५जी नेटवर्कच्या क्षेत्रांमध्ये तुम्हाला अनलिमिटेड ५जी डेटाचा आनंद घेता येईल. याव्यतिरिक्त या प्लॅनमध्ये तुम्हाला Amazon Prime Lite मेंबरशिप दिली जाईल; ज्यामध्ये टीव्ही शो, सिनेमा फ्रीमध्ये प्रवेश करता येईल. तसेच यामध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाउडमध्ये मोफत प्रवेश आणि क्लाउड स्टोरेज पर्यायदेखील उपलब्ध असेल.

दोन्ही जिओ मोबाईल प्रीपेड प्लॅन्समध्ये डेटा, व्हॉइस कॉलिंग, एसएमएसच्या ऑफर्स सारख्या आहेत. पण, जे स्विगीवरून अन्न मागवतात, त्यांच्यासाठी १०२८ हा प्लॅन बेस्ट ठरेल आणि दुसरीकडे १०२९ हा प्लॅन वेब सीरिज बघू इच्छिणाऱ्यांसाठी बेस्ट आहे. कारण- यामध्ये Amazon Prime Lite ची मेंबरशिप देण्यात आली आहे. तर, मग तुम्ही कोणत्या गोष्टीला प्राधान्य देता, हे पाहून या दोघांपैकी एक प्लॅन निवडू शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance jio launched two new prepaid plans priced at 1028 and 1029 rupees then which plan is better asp