आयपीएल २०२२ सुरू झाले आहे. ज्यासोबत टेलिकॉम कंपन्या त्यांचे नवीन प्लॅन ऑफर करत आहेत. डिस्ने + हॉटस्टार सोबत, प्रमुख दूरसंचार कंपन्या अमर्यादित डेटा आणि विनामूल्य कॉलिंग आणि बरेच काही ऑफर करत आहेत. दरम्यान, रिलायन्स जिओने ५५५ रुपयांचा रिचार्ज प्लॅन लॉंच केला आहे. ज्यामध्ये डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन एका वर्षासाठी दिले जात आहे. ज्याद्वारे तुम्ही आयपीएल २०२२ विनामूल्य पाहू शकाल.
त्याच वेळी, जिओने आणखी एक योजना ग्राहकांसाठी आणली आहे, ज्यामध्ये डिस्ने + हॉटस्टार सदस्यता एका वर्षासाठी जोडली गेली आहे. यासोबतच या प्लॅनमध्ये दररोज २.५ जिबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग दिले जात आहे. दुसरीकडे, जिओचा ५५५ रुपयांचा रिचार्ज प्लॅन ५५ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये आणखी काय दिले जात आहे ते जाणून घेऊयात.
जिओचा ५५५ रुपयांचा प्लॅन
५५५ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन जोडला गेला आहे. ज्यामध्ये डिस्ने + हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन वर्षभर दिले जात आहे. याशिवाय यामध्ये ५५ जिबी (GB) अनलिमिटेड डेटा दिला जात आहे. हे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. यामध्ये तुम्हाला फ्री कॉलिंग आणि एसएमएस सुविधेचा लाभ दिला जात नाही.
२९९९ रिचार्ज योजना
जिओचा हा प्लॅन आयपीएलला लक्षात घेऊन लॉंच करण्यात आला आहे. ज्यामध्ये Disney Plus Hoster सोबत २.५ जिबी प्रति दिन डेटा पॅक दिला जात आहे. यामध्ये ग्राहकाला दररोज १०० एसएमएस दिले जातात. त्याची वैधता ३५६ दिवस आहे.
यासोबतच कंपनी २७९ रुपयांचा प्लॅन देखील देत आहे. ही ऑफर काही निवडक लोकांना दिली जात आहे. ज्यासोबत Disney Plus Hotstar चे सबस्क्रिप्शन देखील आहे. ज्यामध्ये १५ जिबी पर्यंत डेटा दिला जात आहे.