Jio Happy New Offer 2023: देशातील प्रमुख टेलिकॉम कंपनी असलेल्या Reliance Jio ने नवीन वर्षाच्या निमित्ताने आपल्या ग्राहकांसाठी नवीन रिचार्ज योजना आणि ऑफर जाहीर केल्या आहेत. Reliance Jio ने येत्या नवीन वर्षाचा निमित्त साधून २०२३ रुपयांचा नवीन प्लॅन Happy New Year 2023 Offer अंतर्गत प्रस्तुत केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी प्लॅनमध्ये भरपूर डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि इतर अनेक फीचर्स दिले आहेत. या प्लॅनमध्ये २५२ दिवसांची दीर्घ वैधता दिली जात आहे. इतकेच नाही तर या दीर्घ वैधतेसह वापरकर्त्यांना सर्व जीओ अॅप्लिकेशन मोफत मिळतील. या प्लॅन्समध्ये मिळणाऱ्या फायद्याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

(हे ही वाचा : स्मार्टफोन घ्यायचा विचार करताय? बघा ‘या’ तुमच्या आवडत्या स्मार्टफोनची किंमत झाली कमी )

Jio Happy New Offer 2023

२०२३ रुपयांचा नवीन प्लॅन

रिलायन्स जिओने नवीन वर्षाच्या निमित्ताने २०२३ रुपयांचा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे.  २०२३ रुपयांच्या नवीन प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना २५२ दिवसांसाठी दररोज २.५GB इंटरनेट डेटा दिला जाईल. म्हणजे एकूण ६३०GB डेटा मिळेल. यासोबतच प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस आणि फ्री कॉलिंगची सुविधा मिळेल.

याशिवाय, प्लॅन नवीन ग्राहकांना Amazon Prime Video सबस्क्रिप्शनसह Jio च्या अॅप्सवर मोफत प्रवेश देखील देते. हे प्लॅन फक्त मर्यादित काळासाठी आणले गेले आहे, म्हणजेच ते कधीही बंद केले जाऊ शकते. जर तुम्हाला हा प्लॅन घ्यायचा असेल तर तुम्ही Jio.com, MyJio अॅपसह इतर प्लॅटफॉर्मवरून खरेदी करू शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance jio launches reliance jio happy new year 2023 recharge plans get 630gb data for full 252 days pdb