देशातील सर्वात महाग रिचार्ज प्लॅन हा रिलायन्स जिओकडे आहे. रिलायन्स जिओ देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. देशामध्ये पहिले ५ जी नेटवर्क जिओनेच सुरु केले आहे. २०२३ च्या अखेरपर्यंत देशातील सर्व भागांमध्ये ५जी सेवा सुरु करण्याचे उद्दिष्ट आहे. हा प्लॅन टेलिकॉम इंडस्ट्रीमधील सर्वात महागडा प्लॅन आहे. सर्वात स्वस्त किंमतीचे प्लॅन ऑफर करणारी कंपनी म्हणून जिओकडे पहिले जाते. मात्र त्याच कंपनीकडे सर्वात महगडा प्लॅन देखील आहे. जिओच्या या सर्वात महागड्या प्लॅनची किंमत ३,६६२ रुपये इतकी आहे. खासगी टेलिकॉम कंपन्यांकडे यापेक्षा महागडा प्लॅन उपलब्ध नाही आहे. या प्लॅनबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
रिलायन्स जिओचा ३,६६२ रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओच्या सर्वात महागड्या प्लॅनची किंमत ३,३६२ रुपये इतकी आहे. या प्लॅनमध्ये एका वर्षाची वैधता मिळते. याशिवाय वापरकर्त्यांना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस तसेच दररोज २.५ जीबी डेटाचे फायदे मिळतात. या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण ९१२.५ जीबी इतका डेटा मिळणार आहे. हा प्लॅन रिचार्ज करणाऱ्या वापरकर्त्यांना कंपनीकडून ५ जी अनलिमिटेड डेटा ऑफर मिळणार आहे. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.
आता हा प्लॅन महाग असण्याचे काय कारण आहे ते जाणून घेऊयात. या प्लॅनसह वापरकर्त्यांना अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मचे फायदे मिळतात. या प्लॅनमध्ये जिओ टीव्हीच्या माध्यमातून सोनी लिव्ह आणि झी ५ मध्ये मोफत प्रवेश मिळतो. सोनी लिव्ह आणि झी ५ चे सबस्क्रिप्शन पूर्ण वर्षासाठी खरेदी करणाऱ्यांसाठी हा एक चांगला प्लॅन फायदेशीर आहे.
तसेच या प्लॅनमध्ये जिओसिनेमा , जिओक्लाऊड आणि जिओ टीव्ही सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मचा फायदा मिळतो. मात्र एकदा का FUP डेटा संपला की इंटरनेटचा स्पीड हा ६४ kbps इतका होतो. रिलायन्स जिओने आतापर्यंत देशातील ७,७६४ भागांमध्ये ५ जी नेटवर्क सुरु केले आहे. २०२३ च्या अखेरपर्यंत देशातील प्रत्येक भागात ५ जी नेटवर्क सुरु करण्याचे जिओचे उद्दिष्ट आहे.