रिलायन्स जिओच्या नेटवर्कला भारतात सकाळी ८ वाजून ५० मिनिटापासून समस्या येत आहेत. अनेक युजर्सच्या मोबाईलवर काही वेळापासून अचानक संपूर्ण नेटवर्क गेल्याचं दिसून येत आहे. याचा फाटका अनेक युजर्सला बसला आहे. अनेक युजर्सने काही वेळ थांबून आपली तक्रार नोंदवायला सुरुवात केली आहे. ट्विटरबद्दल अनेक पोस्ट केल्या जात आहेत. सोशल मीडियावर जिओचे नेटवर्क डाऊन झाल्याचे मेसेजही पोस्ट केले जात आहेत.
हा बिघाड नेमका कशामुळे झाला आहे, याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. जिओ केअरच्या ऑफिशियल अकाऊंटला अनेकांनी टॅग करत तक्रार नोंदवली आहे. परंतु अजूनही रिलायन्स जिओने याबदल काहीही अधिकृत माहिती दिलेली नाही. काही युजर्सकडे नेटवर्क येत जात आहे.
Reliance Jio Infocomm Limited d/b/a Jio एक भारतीय मोबाइल नेटवर्क ऑपरेटर आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीचे आणि नवी मुंबई, महाराष्ट्र येथे मुख्यालय असलेले, ते सर्व २२ दूरसंचार मंडळांमध्ये कव्हरेज असलेले राष्ट्रीय LTE नेटवर्क चालवते.