Reliance Jio New Plan: तुम्हीही रिलायन्स जिओचा प्रीपेड नंबर वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. होय, काही महिन्यांपूर्वी Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea ने त्यांच्या मोबाईल रिचार्जचे दर वाढवले ​​होते. त्यावेळी मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स जिओने आपल्या अनेक प्लॅनच्या किंमती बदलल्या होत्या. पण काही काळानंतर, कंपनीने आपला ९९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन परत आणला. जुलै महिन्यात कंपनीने या प्लानची किंमत १,१९९ रुपये वाढवली होती. पण नवीन प्लॅन ग्राहकांसाठी अनेक फायद्यांसह लॉन्च करण्यात आला आहे.

नवीन प्लॅनच्या वैधतेमध्ये सर्वात मोठा बदल करण्यात आला आहे. याआधी कंपनीने प्लॅनची ​​वैधता ८४ दिवसांसाठी दिली होती. मात्र आता त्यात १४ दिवसांची वाढ करून ९८ दिवस करण्यात आली आहे. म्हणजेच १४ दिवसांची अधिक वैधता मिळेल. यापूर्वी या प्लॅनमध्ये कंपनी दररोज ३GB डेटा देत होती. पण जेव्हा प्लॅन पुन्हा लाँच करण्यात आला तेव्हा तो २GB इतका कमी करण्यात आला. तुम्हाला संपूर्ण प्लॅनमध्ये एकूण १९२GB डेटा मिळेल, जो आधी २५२GB होता. जरी दैनंदिन डेटाची उपलब्धता कमी झाली असली तरीही, या ९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये अमर्यादित ५G डेटा उपलब्ध आहे.

actor Nitin Chauhaan dies at 35
‘क्राइम पेट्रोल’ फेम अभिनेत्याचं निधन, ३५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Successful test of nuclear capable K 4 missile
अण्वस्त्रवाहू ‘के-४’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
Eknath Shinde In Serious Mood
Eknath Shinde Serious Mood : अमित शाह यांच्यासह सगळ्या हसऱ्या चेहऱ्यांमध्ये एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावरचे भाव चर्चेत, महायुतीच्या बैठकीचा फोटो काय सांगतोय?
Kanpur Fire
Kanpur Fire : धक्कादायक! दिव्यामुळे घराला लागली आग; उद्योगपती पती-पत्नीसह मोलकरणीचा दुर्दैवी मृत्यू
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Manoj Jarange News
Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा

दररोज १०० एसएमएसची सुविधा

‘हिरो 5G’ प्लॅन असे नाव दिले आहे. सर्वात कमी किमतीचा अनलिमिटेड 5G प्लॅन असलेल्या ३४९ रुपयांच्या प्लॅनसोबतही हे नाव शेअर करण्यात आले आहे. रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये पूर्वीप्रमाणेच रोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलची सुविधा मिळते. म्हणजेच तुम्हाला हवं तेवढं बोलून रोज १०० SMS पाठवू शकता. यामध्ये एअरटेलचा ९७९ रुपयांचा प्लॅनही जिओच्या मागे नाही, ज्यामध्ये युजर्सलाही त्याच सुविधा मिळतात.

हेही वाचा >> Jio New Recharge: वाहह! फक्त इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा जबरदस्त रिचार्ज प्लॅन

‘हा’ प्लॅन का घ्यावा?

लक्षात घ्या की, तब्बल २०० रुपयांनी स्वस्त प्लॅन झालाय. जुलै महिन्यात कंपनीने या प्लॅनची किंमत वाढवून १,१९९ रुपये केली होती. त्यामुळे ग्राहकांसाठी अनेक फायद्यांसह नवीन प्लॅन मिळू शकतो. तसेच या प्लॅनची वैधता कंपनीकडून ८४ दिवसांसाठी देण्यात आली होती. पण आता ती १४ दिवसांनी वाढवून ९८ दिवस करण्यात आली आहे. म्हणजेच याला आणखी १४ दिवसांची वैधता मिळणार आहे. आम्ही माहिती दिली आहे. आता तुमच्या बजेटनुसार आणि गरजेनुसार तो घ्यावा की नाही, हे तुम्ही ठरवू शकता.