रिलायंस जिओ (Reliance Jio) ने एक नवीन रिचार्ज प्लॅन आणला आहे आणि प्लॅनमध्ये ३६५ दिवसांची वैधता देण्यात आली आहे. तुम्ही जास्त काळासाठीचा रिचार्ज प्लॅन शोधत असाल, तर तुम्हाला जिओची ही नवीन ऑफर नक्कीच आवडेल. जाणून घ्या रिचार्ज प्लॅनबद्दल…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जिओने २९९९ रुपयांचा हा रिचार्ज प्लॅन आणला आहे. या प्लॅनचा कालावधी ३६५ दिवसांचा आहे. प्लानमध्ये दररोज २.५GB डेटा उपलब्ध असेल आणि अशा प्रकारे प्लानमध्ये एकूण ९१२.५GB डेटा उपलब्ध होईल. दैनंदिन डेटा मर्यादा पूर्ण झाल्यानंतर, स्पीड ६४kbps पर्यंत कमी होईल. जिओच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल्स आणि दररोज १०० एसएमएसचा लाभ मिळतो. जिओच्या या नवीन प्लॅनमध्ये मोफत जियो अॅप्सचे सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे, ज्यामध्ये जिओ TV, जिओ सिनेमा, जिओसिक्योरिटी (JioTV, Jio Cinema, Jio Security) आणि जिओ क्लाउड (Jio Cloud) यांचा समावेश आहे.

(हे ही वाचा: EPFO Update: UAN च्या मदतीने तुमचे नवीन बँक खाते ऑनलाइन करा अपडेट, जाणून घ्या प्रक्रिया)

जर आपण इतर जास्त अवधीच्या प्लॅनबद्दल बोललो तर, जिओच्या २५४५ रुपयांच्या रिचार्जवर ३३६ दिवसांची वैधता मिळते आणि या प्लॅनमध्ये दररोज १.५GB डेटा मिळेल. याशिवाय ३६५ दिवसांसाठी ३११९ रुपये आणि २८७९ रुपयांचे प्लॅन उपलब्ध आहेत, जे प्रतिदिन २GB डेटा देतात.