रिलायन्स जिओ देशातील एक सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. जिओनेच भारतात सर्वात पहिले ५ जी नेटवर्क सुरु केले आहे. डिसेंबर २०२३ च्या अखेरपर्यंत देशातील प्रत्येक भागात ५जी नेटवर्क पोहोचवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन्स लॉन्च करतच असते. ज्यात वापरकर्त्यांना अनेक फायदे मिळत असतात. भारतात असे अनेक जिओ ग्राहक आहेत ज्यांना दररोज १.५ जीबी डेटा मिळणारे प्लॅन रिचार्ज करायचे आहेत. दररोज १.५ जीबी डेटा मिळणारे प्लॅन ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. तर दररोज १.५ जीबी डेटा मिळणारे प्लॅन्स कोणकोणते आहेत आणि त्यात कोणते फायदे ग्राहकांना मिळतात हे जाणून घेऊयात.
रिलायन्स जिओकडे सप्टेंबर महिन्यात असे अनेक प्लॅन्स आहेत. ज्यामध्ये दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. कंपनीने असे एकूण ९ प्रीपेड प्लॅन्स ऑफर करत आहे. या प्लॅन्समध्ये १९९ रुपये , २३९ रुपये, २५९ रुपये , ४७९ रुपये , ५२९ रुपये , ६६६ रुपये आणि ७३९ रुपये व २,५४५ रुपये या किंमतीचे प्लॅन्स येतात. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.
दररोज १.५ जीबी डेटा मिळणारे प्रीपेड प्लॅन्स
वरती दिलेल्या सर्व प्लॅन हे १.५ जीबी डेटासह येतात. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस करण्याचे फायदे मिळतात. १९९ रुपयांच्या प्लॅन व्यतिरिक्त सर्व प्लॅन्स हे जिओच्या ट्रू ली अनलिमिटेड ५ जी डेटा ऑफरसह येतात. २६९ रुपये, ५२९ रुपये आणि ७३९ रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना JioSaavn Pro चे मोफत सब्स्क्रिप्शन देखील मिळते. या सर्व प्लॅन्सची वैधता मिळते. १९९ रुपयांच्य प्लॅनची वैधता २३ दिवसांची आहे. तर २३९ आणि २६९ रुपयांच्या प्लॅनमध्ये २८ दिवसांची वैधता मिळते.
वरील सर्व प्लॅन्सपैकी २५९ रुपयांच्या प्लॅनमध्ये पूर्ण महिन्याची वैधता मिळते. ५२९ आणि ४७९ रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना ५६ दिवसांची वैधता मिळते. तर ६६६ आणि ७३९ रुपयांच्या प्लॅन्समध्ये ८४ दिवसांची वैधता मिळते. तर २,४५४ रुपयांच्या प्लॅनमध्ये ३३६ दिवसांची वैधता मिळते. या सर्व प्लॅन्समध्ये ग्राहकांना जिओसिनेमा, जिओ टीव्ही आणि जिओ क्लाउड यासह जिओ Apps चा मोफत प्रवेश मिळतो. हे सर्व प्लॅन्स १.५ जीबी डेटा दररोज मिळणारे आहेत. जे तुम्ही रिलायन्स जिओवरून खरेदी करू शकता.