Reliance Jio या टेलिकॉम कंपनीने देशामध्ये पहिले ५जी नेटवर्क सुरु केले आहे. सध्या देशातील सर्वात आघाडीची व जास्त वापरकर्ते असलेली कंपनी ही जिओ आहे. जिओ आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन्स लॉन्च करत असते. मात्र सध्या आयपीएलच्या सीझनमुळे जिओच्या २१९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची मागणी जास्त प्रमाणात आहे.
सध्या आयपीएल सुरु असल्याने ग्राहकांना सामने बघण्यासाठी दररोज जास्त डेटा वापरण्यासाठी लागतो. मात्र जास्त डेटा असणारे रिचार्ज प्लॅन थोडे महाग असतात. मात्र जिओ वापरकर्ते २१९ रुपयांच्या प्लॅनला अधिक प्रतिसाद देत आहेत. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अणे फायदे मिळत आहेत. ते फायदे कोणते आहेत ते जाणून घेऊयात.
रिलायन्स जीओचा २१९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन
जिओच्या २१९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना ३ जीबी डेटा ऑफर केला जातो. या प्लॅनची एकूण वैधता ही १४ दिवसांची आहे. य्यमध्ये वापरकर्त्यांना एकूण ४४ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच ३ जीबी दररोज डेटा आणि २ जीबी एक्सट्रा डेटा कंपनीकडून दिला जातो. तसेच या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा दिली जाते. तसेच या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज १०० एसएमएस करण्याची सुविधा मिळते. २१९ रुपयांच्या प्लॅनमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाउड या सुविधा मिळतात. या प्लॅनमध्ये जिओ टीव्हीवर फिल्मसह जिओसिनेमावर मोफत आयपीएल मॅच पाहता येणार आहे.
कोणता प्लॅन आहे बेस्ट ?
जर का तुम्ही प्लॅन दोनवेळा रिचार्ज केला तर तुम्हाला ४३८ रुपये द्यावे लागणार आहे. यामध्ये तुम्हाला २८ दिवसांसाठी एकूण ८८ जीबी डेटा मिळणार नाही. जर का तुम्ही २८ दिवसांसाठी एकच रिचार्ज करता तो तुम्हाला ३९९ रुपयांमध्ये ३ जीबी डेटा म्हणजेच एकूण ९० जीबी देता मिळतो. तसेच अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस करण्याची सुविधा मिळते.