रिलायन्स इंडस्ट्रीने अत्याधुनिक वायरलेस तंत्रज्ञान वापरून वायरलेस ब्रॉडबँड सेवा सुरू केली. त्याला ‘जिओ एअर फायबर’ (Jio AirFiber) असे नाव देण्यात आले आहे. या एअर फायबरच्या माध्यमातून वायरलेस ५ जी हायस्पीड इंटरनेटचा आनंद वापरकर्ते घेत आहेत. जिओ एअर फायबर एका वायफाय हॉटस्पॉटप्रमाणे काम करते. कोणत्याही केबलशिवाय हे उपकरण जवळपास १ GBPS पर्यंत इंटरनेट स्पीड देते. विशेष म्हणजे जिओ एअर फायबरशी लॅपटॉप, कॉम्प्युटर, स्मार्ट टीव्ही, सेट-टॉप बॉक्स, स्मार्टफोन अशी वेगवेगळी उपकरणं जोडता येतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तर जिओ फायबर कनेक्शन सध्या ५०० हून अधिक शहरांमध्ये उपलब्ध आहे. या वायरलेस सेवेमुळे कंपनीच्या उत्पन्नातही मोठी भर पडत आहे. त्यामुळे कंपनी जिओ वापरकर्त्यांसाठी काही खास ऑफर घेऊन आली आहे, त्यापैकी एक डेटा बूस्टर प्लॅन आहे.

जिओच्या मते कंपनीचे एअरफायबर (Air Fiber) वापरकर्ते दर महिन्याला १TB हाय स्पीड डेटाचा आनंद घेऊ शकतात. मात्र, या हाय स्पीडची मर्यादा ओलांडली की, याचा वेग कमी होईल. तर वापरकर्त्यांना अधिक डेटा प्रदान करण्यासाठी जिओने १०१, २५१, ४०१ रुपयांपासून सुरू होणारे डेटा बूस्टर पॅक ऑफर केले आहेत.

ज्या वापरकर्त्यांना १टीबी पेक्षा जास्त हाय स्पीड डेटाची आवश्यकता आहे, ते पुढील डेटा प्लॅन्सची निवड करू शकतात.

जिओ फायबर १०१ रुपयांचा डेटा बूस्टर प्लॅन : हा प्लॅन तुमच्या बेस (Base) प्लॅनच्या तुलनेत १०० जीबी अधिक डेटा ऑफर करतो.

जिओ एअर फायबर २५१ रुपयांचा डेटा बूस्टर प्लॅन : या प्लॅनमध्ये तुम्हाला बेस प्लॅनच्या तुलनेत ५०० जीबी अधिक डेटा ऑफर करतो.

जिओ एअर फायबर ४०१ रुपयांचा डेटा बूस्टर प्लॅन : या प्लॅनमध्ये तुम्हाला बेस प्लॅनच्या तुलनेत १००० जीबी डेटा अधिक ऑफर करतो.

हेही वाचा…१० हजारपेक्षा कमी किमतीत Motorola चा नवीन स्मार्टफोन लाँच ! विक्रीला ‘या’ तारखेपासून सुरुवात; पाहा जबरदस्त फीचर्स

खास गोष्ट अशी की, डेटा बूस्टर प्लॅनची स्वतःची (Validity) वैधता नाही. या प्लॅन्सना सक्रिय करण्यासाठी वापरकर्त्यांना बेस प्लॅनची आवश्यकता आहे. तुम्ही त्यांचा वापर नवीन जिओ एअर फायबर कनेक्शनसह किंवा महिन्याचा प्लॅन म्हणून करू शकता. तुम्ही या डेटा बूस्टर प्लॅनसह एकाच बिलिंगमध्ये अनेक वेळा रिचार्जदेखील करू शकता. याव्यतिरिक्त, डेटा बूस्टर योजनांचा स्पीड तुमच्या जिओ फायबर बेस प्लॅनच्या स्पीडशी जुळेल. उदाहरणार्थ, जर तुमचा बेस प्लॅन 100Mbps असेल, तर तुमचा डेटा बूस्टर प्लॅन तुम्हाला 100Mbps स्पीडने 1TB डेटादेखील देईल. या योजनांसह रिचार्ज करण्यासाठी माय जिओ किंवा जिओ डॉट कॉमला भेट द्या.