रिलायन्स जिओ ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. देशामध्ये सर्वात पहिल्यांदा रिलायन्स जिओने जी नेटवर्क लॉन्च केले आहे. २०२३ च्या अखेरपर्यंत देशातील सर्व भागांमध्ये ५ जी नेटवर्क पोहोचवण्याचे उद्दिष्ट जिओने ठेवले आहे. तसेच कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च करत असते. ज्यात ग्राहकांना ओटीटीसह अनेक फायदे देखील मिळत असतात. वापरकर्त्यांसाठी जिओ काही प्रीपेड मोबाइल, फायबर प्लॅन्स घेऊन आली आहे. ज्यात डेटा आणि अन्य फायद्यांसह नेटफ्लिक्सचे मोफत सबस्क्रिप्शन आणि अन्य ओटीटी प्लॅटफॉर्मचा फायदा मिळणार आहे. त्यामुळे आता वापरकर्त्यांना प्रीपेड प्लॅन वेगळा व ओटीटीचे वेगळे सबस्क्रिप्शन घेण्याची आवश्यकता भासणार नाही.

जर का तुम्ही ओटीटीचे फायदे मिळणाऱ्या प्लॅनच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खालील जिओचे प्लॅन फायदेशीर ठरू शकतात. यामध्ये कॉलिंग, डेटा आणि ओटीटीचे फायदे ऑफर करणाऱ्या जिओच्या प्लॅन्सबद्दल जाणून घेऊयात. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

WATCH Radhika Merchant and Anant Ambani’s fun Turkish ice cream moment in Dubai goes viral
राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी फिरत आहेत दुबईत! Turkish आइस्क्रिम खाताना राधिकाचा मजेशीर Video होतोय Viral
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
stand up comedy in india
मनोरंजनाची तरुण परिभाषा
Jai-Veeru Swiggy's entry on Dalal Street welcomed by Zomato
“जय-वीरू!” दलाल स्ट्रीटवर स्विगीची एन्ट्री, झोमॅटोने केलं स्वागत! पाहा, Netflix, Amazon, Paytm, Coca Colaची भन्नाट प्रतिक्रिया
Revanth Reddy Express Adda
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी एक्स्प्रेस अड्डावर, पाहा मुलाखत लाईव्ह
neetu kapoor ridhhima kapoor sahni dance on jamal kadu
Video : आई अन् लेकीचा ‘जमाल कुडू’ गाण्यावर डान्स, रिद्धिमा कपूर साहनीबरोबर नीतू कपूर यांनी धरला ठेका; पाहा व्हिडीओ
My Name The Night Agent Vincenzo The Glory
नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन आहे? रविवारी पाहा ‘या’ जबरदस्त सस्पेन्स-थ्रिलर वेब सीरिज, वाचा यादी

हेही वाचा : Google Pixel 8 launch Live Streaming: उद्या लॉन्च होणार गुगल पिक्सेल ८ सिरीज; कुठे पाहता येणार लाइव्ह इव्हेंट? जाणून घ्या

मोफत नेटफ्लिक्ससह रिलायन्स जिओचे मोबाइल प्रीपेड प्लॅन्स

रिलायन्स जिओच्या १,०९९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये नेटफ्लिक्सचे मोफत मोबाइल सब्स्क्रिप्शन वापरकर्त्यांना मिळणार आहे. याची वैधता ८४ दिवसांची असणार आहे. जिओ वेलकम ऑफर अंतर्गत यामध्ये दररोज २ जीबी डेटा आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचे फायदे मिळणार आहेत.

तसेच जिओच्या १,४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये जिओ वेलकम ऑफरसह अनलिमिटेड ५जी डेटा, दररोज ३ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि ८४ दिवसांसाठी मोफत नेटफ्लिक्सचे बेसिक सबस्क्रिप्शन मिळणार आहे. जिओच्या १,०९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना ४८०P रिझोल्युशनमध्ये नेटफ्लिक्सवरील कंटेंट पाहता येणार आहे. तर १,४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये SD रिझोल्युशनसह नेटफ्लिक्सवरील कंटेंट पाहता येणार आहे.

हेही वाचा : अँड्रॉइड आणि आयफोनवर व्हॉट्सअ‍ॅप ‘Channels’ फिचर कसे हाइड करायचे? ‘या’ आहेत सोप्या स्टेप्स

मोफत नेटफ्लिक्ससह रिलायन्स जिओचे फायबर प्लॅन्स

रिलायन्स जिओच्या १,४९९ रुपयांच्या फायबर प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना ३०० mbps पर्यंत इंटरनेट स्पीड आणि नेटफ्लिक्स बेसिक्सह १८ ओटीटी प्लॅटफॉर्मचा फायदा मिळणार आहे. ज्यात जिओसिनेमा, जिओसावन , Amazon प्राइम आणि डिस्नी + हॉटस्टारचा समावेश आहे.

रिलायन्स जिओच्या २,४९९ रुपयांच्या फायबर प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना ५०० mbps पर्यंत इंटरनेट स्पीड आणि नेटफ्लिक्स स्टॅंडर्डसह १६ ओटीटी प्लॅटफॉर्मचा फायदा मिळणार आहे. ज्यात Amazon प्राइम आणि डिस्नी + हॉटस्टारचा समावेश आहे.

रिलायन्स जिओच्या ३,४९९ रुपयांच्या फायबर प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना १ gbps पर्यंत इंटरनेट स्पीड आणि नेटफ्लिक्स स्टॅंडर्डसह १९ ओटीटी प्लॅटफॉर्मचा फायदा मिळणार आहे. ज्यात Amazon प्राइम आणि डिस्नी + हॉटस्टारचा समावेश आहे. तसेच यात वापरकर्त्यांना ३५००० जीबी डेटा आणि ७५०० जीबी डेटा मिळणार आहे.

रिलायन्स जिओच्या ८,४९९ रुपयांच्या फायबर प्लॅनमध्ये १ gbps डेटा आणि ६६०० जीबी डेटा कंपनी ऑफर करते. हा जिओचा सर्वात महागडा प्लॅन आहे. यामध्ये वापरकर्त्यांना नेटफ्लिक्स स्टॅंडर्डसह Amazon प्राइमसह अन्य १९ Apps चा फायदा मिळतो.