Jio Data Booster Plans: ऑफिसचे काम, व्हिडीओ एडिट करणे, ऑनलाइन मीटिंग अटेंड करण्यापासून ते अगदी यूपीआय वा गूगल पे द्वारे पेमेंट ते अगदी मालिका, चित्रपट पाहण्यापर्यंत अशा विविध गोष्टींसाठी आजच्या युगात ‘इंटरनेट’ची गरज पडते. पण, दैनंदिन इंटरनेट डेटा संपणे ही डोकेदुखी ठरू लागली आहे. कारण डेटा संपल्याने तुमचे हातातले काम अडकून राहते. यासाठी मोबाइल प्रीपेड प्लॅन्स ‘अमर्यादित इंटरनेट’ ऑफर करतात. पण, दैनंदिन इंटरनेट वापर मर्यादा संपल्यानंतर वेग कमी होऊन सुमारे 64 KBPS होतो.
तर ही बाब लक्षात घेता कंपनी जिओ युजर्ससाठी त्यांचे ‘डेटा बूस्टर प्रीपेड प्लॅन्स’ची यादी घेऊन आली आहे. डेटा बूस्टर प्लॅन सामान्य रिचार्ज प्लॅनपेक्षा वेगळा आहे. असे प्लॅन्स युजरच्या अतिरिक्त डेटाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ऑफर केल्या जातात. हा पॅक फक्त आधीपासून ॲक्टिव्ह असलेल्या रिचार्ज प्लॅनसह वापरला जाऊ शकतो. डेटा बूस्टर प्लॅनची स्वतःची कोणतीही स्वतंत्र व्हॅलिडिटी नाही.
जिओ डेटा बूस्टर प्लॅन्सची यादी पुढीलप्रमाणे :
१५ रुपयांचा प्लॅन (Jio Rs 15 plan) – या प्लॅनमध्ये तुम्हाला १ जीबी डेटा मिळेल, तसेच तुमच्या ॲक्टिव्ह प्लॅनप्रमाणे हा वैध राहील.
१९ रुपयांचा प्लॅन (Jio Rs 19 plan) – युजर्सना या प्लॅनमध्ये १.५ जीबी डेटा दिला जाईल; ज्या वापरकर्त्यांना थोडा अतिरिक्त डेटा आवश्यक आहे त्यांच्यासाठी हा एक सोयीस्कर पर्याय बनवतो. तसेच तुमच्या ॲक्टिव्ह प्लॅनप्रमाणे हा वैध राहील.
हेही वाचा…रिचार्ज न केल्यास तुमचा मोबाइल क्रमांक… TRAI चा ‘हा’ नवीन नियम पाहा; तुमच्या खिशावर पडेल भार
२५ रुपयांचा प्लॅन (Jio Rs 25 plan) – २५ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला २ जीबी डेटा प्रदान केला जाईल. हा प्लॅन डेटा लवकर संपण्याची चिंता न करता ब्राउझिंग किंवा स्ट्रीमिंग सुरू ठेवू शकता.
२९ रुपयांचा प्लॅन (Jio Rs 29 plan) – ज्या युजर्सना २ जीबी डेटा पुरत नसेल त्यांनी २९ रुपयांचा २.५ जीबी डेटाचा रिचार्ज करावा.
६१ रुपयांचा प्लॅन (Jio Rs 61 plan) – या प्लॅनमध्ये ग्राहकांना चक्क ६ जीबी अतिरिक्त डेटा दिला जाईल.
१२१ रुपयांचा प्लॅन (Jio Rs 121 plan) – जिओ कंपनीच्या १२१ रुपयांच्या डेटा बूस्टर प्लॅनसह कंपनी आपल्या प्रीपेड युजर्सना अतिरिक्त १२ जीबी डेटा ऑफर करते.
क्रिकेटप्रेमी ग्राहकांसाठी खास प्लॅन :
क्रिकेट डेटा पॅक जिओ २२२ रुपये (Cricket data pack Jio Rs 222) –
जिओ कंपनीच्या २२२ रुपयांच्या डेटा बूस्टर प्लॅनसह कंपनी आपल्या प्रीपेड युजर्सना अतिरिक्त ५० जीबी डेटा ऑफर करते. तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार डेटा बूस्टर प्रीपेड प्लॅन्सची यादी पाहून डेटा बूस्टर प्लॅन सामान्य रिचार्ज प्लॅनपेक्षा वेगळा भरू शकता.