Jio Recharge Plans: अनेक मोठ्या कंपनी नेहमी मोठ्या रक्कमेत १ रुपया सूट देऊन ९९९/- , ४९९/- असे विचित्र दर ठेवतात, आता या १ रुपयात मी काय बंगला बांधणार का असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल ना? पण खरंतर ही कंपन्यांची मोठी ट्रिक आहे. पूर्ण आकडा बघण्याऐवजी जेव्हा अशी ९ ने संपणारी किंमत आकारली जाते तेव्हा ग्राहकांचे अधिक लक्ष वेधून घेतले जाते असा दावा अनेक कंपन्यांकडून केला जातो. हाच अलिखित नियम पाळून आता जिओकडू एक भन्नाट ऑफर देण्यात आली आहे. ७५० रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये केलेला बदल पाहता आता वापरकर्त्यांकडून जिओला ट्रोल केलं जात आहे.

कसा आहे जिओचा नवा रिचार्ज पॅक?

इंडिया टुडेच्या अहवालानुसार, “रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन प्रीपेड प्लॅन लॉन्च केला आहे, ज्यामध्ये अमर्यादित कॉलिंग, OTT सबस्क्रिप्शन आणि ९० दिवसांच्या वैधतेसह २ जीबी दैनंदिन डेटा केवळ ७५० रुपयांमध्ये उपलब्ध केलेला आहे. हा प्लॅन टॉप ट्रेंडिंग रिचार्ज पॅकपैकी एक आहे.

VIRAL: ‘या’ चुकीने ‘तो’ झाला ११,६७७ कोटींचा मालक; बँकेने पैसे परत घेण्याआधी केलं असं काही की…

आता ग्राहकांना फायदा करून देण्यासाठी जिओने नुकतेच प्लॅनमध्ये बदल करून संपूर्ण १ रुपयाची सूट दिली आहे. जिओचा हा प्लॅन अवघ्या ७४९ रुपयांमध्ये मिळायला लागल्यापासून नेटकऱ्यांनी रिलायन्सला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

पाहा नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

दरम्यान प्लॅनमधील एक रुपयाच्या बदलामुळे जिओ वापरकर्ते अतिरिक्त १०० एमबी डेटा वापरू शकणार नाहीत. ७५० च्या प्लॅनसह, जिओ १ रुपयात अतिरिक्त १०० MB डेटा ऑफर करत होते. परंतु आता, ७४९ रुपयांसह, वापरकर्त्यांना अतिरिक्त डेटा मिळणार नाही.

Story img Loader