रिलायन्स जिओ देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी कायमच नवनवीन प्लॅन्स लॉन्च करत असते. ज्यात वापरकट्यानं अनेक फायदे मिळतात. मात्र आता जिओ वापरकर्त्यांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. रिलायन्स जिओने आपल्या ऑफरमधून ११९ रुपयांचा प्लॅन काढून टाकला आहे. टेलिकॉम कंपनीने २०२१ च्या उत्तरार्धात दरवाढीनंतर हा प्लॅन लॉन्च केला होता. यामध्ये १४ दिवसांची वैधता, दररोज १.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस करण्याचे फायदे वापरकर्त्यांना मिळत होते.

आता हा प्लॅन देशातील कोणत्याही भागातील वापरकर्त्यांसाठी उपलब्ध नसणार आहे. कंपनीने ११९ रुपयांचा सर्वात परवडणारा बंद केला असून नवीन प्लॅन ऑफर केला आहे. हे पाऊल याआधी एअरटेलनेदेखील उचलले होते. यामुळे कंपनीला प्रति वापरकर्ता सरासरी महसूल (ARPU) सुधारण्यास मदत होणार आहे. रिलायन्स जिओचा आता सर्वत परवडणारा प्लॅन हा १४९ रुपयांचा असणार आहे. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.

Kavadi for lord importance of kavadi price of a kavadi
लोक-लौकिक : ‘कवडी’मोल!
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Reliance Industries Q3 results,
रिलायन्स इंडस्ट्रीजचा तिमाही नफा वाढून १८,५४० कोटींवर; शेअरच्या भाव वाढेल काय, विश्लेषकांचे अंदाज काय?  
poco x7 pro and poco x7 launched in india
Poco X7 Series: बजेट फ्रेंडली आणि पॉवर परफॉर्मन्स असलेले पोकोचे दोन फोन लाँच; किंमता आणि फिचर्स जाणून घ्या
Flipkart Monumental Sale
Flipkart Monumental Sale: एक लाखाच्या आत खरेदी करा TVS ‘ही’ बाईक; सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी
Samsung Galaxy S25 Series Launch In India
Samsung Galaxy S25 : सॅमसंगचा पॉवरफूल स्मार्टफोन होणार ‘या’ तारखेला लाँच! कशी करायची प्री-बुकिंग? जाणून घ्या…
Mumbai targeted by cyber thugs after gang war terrorist attacks print exp
गँगवॉर, दहशतवादी हल्ल्यांनंतर मुंबई सायबरठगांचे टार्गेट… गतवर्षी १२०० कोटींची सायबर फसवणूक! केवळ १० टक्के रिकव्हरी! 
highest paid man in the world
तासाला दोन कोटी, तर वर्षाला १७ हजार कोटी; जगात सर्वाधिक पगार घेणारे जगदीप सिंग कोण आहेत?

हेही वाचा : WhatsApp ने आणले नवीन फिचर; वापरकर्त्यांना आता नावाशिवाय ग्रुप तयार करता येणार

रिलायन्स जिओचा १४९ रूपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओचा १४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना २० दिवसांची वैधता मिळते. तसेच जिओसिनेमा , जिओक्लाऊड आणि जिओ टीव्ही या फायद्यांसह अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि दररोजचा १ जीबी डेटा वापरायला मिळतो. हा प्लॅन घेणारे वापरकर्ते जिओ वेलकम ऑफरसाठी पात्र नाहीत. कंपनीचा सर्वात स्वस्त प्लॅनची किंमत एअरटेलच्या १५५ रुपयांच्या सर्वात स्वस्त प्लॅनच्या अगदी जवळ आहे. जर का तुम्ही वैधता आणि व्हॉइस कॉलिंगचा फायदा शोधात असाल तर एअरटेलचा प्लॅन इथे एक चांगला पर्याय आहे. यामध्ये २४ दिवसांची वैधता अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग मिळते.

रिलायन्स जिओ या देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे कंपनीला आपला ARPU ची आकडेवारी वाढवण्यास मदत मिळणार आहे. जो Q1 FY24 मध्ये १८०.५ रुपये इतका होता. याच्या तुलनेत एअरटेलचा ARPU २०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. Airtel आपल्या प्रत्येक ग्राहकाकडून Jio पेक्षा अधिक कमाई करत आहे. रिलायन्स जिओला एअरटेलच्या ARPU च्या जवळ पोहोचण्यासाठी दरात वाढ आणि अधिक पैसे देणाऱ्या ग्राहकांची गरज आहे.

Story img Loader