Reliance Jio ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. कंपनीने देशामध्ये सर्वात पहिले ५जी नेटवर्क सुरु केले आहे. तसेच आता जिओने एक लॅपटॉप लॉन्च केला आहे. रिलायन्स कंपनीने आपला JioOS द्वारे समर्थित असलेला JioBook लॅपटॉप लॉन्च केला. हे ४ जी डिव्हाइस विद्यार्थ्यांसाठी आहे. तसेच जीओटीव्ही App द्वारे शैक्षणिक कंटेंटमध्ये प्रवेश देतो. या लॅपटॉपमध्ये एक मोठा ट्रॅकपॅड आहे. जिओबुक लॅपटॉपमध्ये कंपनीने मॅट फिनिश दिले आहे. याचे वजन केवळ ९९० ग्रॅम आहे. हे MediaTek MT 8788 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे आणि यात ११.६ इंचाचा अँटी ग्लेअर HD स्क्रीन मिळते. तसेच यामध्ये ४जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. जे मायक्रोएसडी कार्ड स्लॉटच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत वाढवता येते.

जिओबुकची विक्री कालपासून सुरू झाली आहे. ही विक्री amazon आणि Reliance Digital द्वारे सुरू आहे. JioBharat V2 फोनच्या विपरीत, JioBook ची उपलब्धता काही खरेदीदारांपुरती मर्यादित नाही. काही दिवसांमध्येच अनेक ठिकाणांहून याची विक्री होईल अशी अपेक्षा आहे. नवीन रिलायन्स जिओबुकची किंमत कंपनीने १६,४९९ रूपये ठेवली आहे. कालपासून सुरू झालेल्या Amazon ग्रेट फ्रिडम सेलमध्ये यावर डिस्काउंट मिळत आहे.

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
artificial intelligence
कुतूहल : चुकांची जबाबदारी निश्चित करण्याचे आव्हान!
How will state boards mobile app be useful for students parents and teachers
राज्य मंडळाचे मोबाइल अॅप विद्यार्थी, पालक, शिक्षकांना कसे ठरणार उपयुक्त?
quantum chip Willow solves in 5 minutes
Quantum Chip :सुपर कॉम्प्युटरलाही हजारो वर्षे लागतील; पण गूगलची ‘ही’ नवी चिप ५ मिनिटांत उत्तर देईल
All about the new wedding invite scam on WhatsApp
सायबरचोरांचे नवे शस्त्र… डिजिटल लग्नपत्रिका! फसवणूक कशी? खबरदारी कोणती?
PAN 2 0 is going Digital Will you still need a physical PAN card as ID proof and KYC document
PAN 2.0 आता डिजिटल होणार: अजूनही फिजिकल PAN कार्डची गरज भासेल का?

हेही वाचा : रिलायन्स जिओचा धमाका! मोबाइलपेक्षाही स्वस्त असा JioBook केला लॉन्च, किंमत फक्त…

जिओबुकची किंमत १६,४९९ रूपये असून अ‍ॅमेझॉनवर ती अजून कमी होऊ शकते. कारण SBI बँकेच्या क्रेडिट कार्डच्या EMI व्यवहारांवर १,५०० रुपयांचा झटपट डिस्काउंट मिळत आहे. याशिवाय खरेदीदार एसबीआय क्रेडिट कार्डच्या नॉन EMI व्यवहारांवर १,२५० रुपयांचा डिस्काउंट मिळवू शकतात. म्हणजेच जिओबुक तुम्ही अ‍ॅमेझॉनवरून १४,४९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये खरेदी करू शकणार आहेत.

जिओबुक हे HD वेबकॅमसह येते. तसेच हे वायरलेस स्कॅनिंग आणि प्रिंटिंगला सपोर्ट करते. तसेच हे एक्सटर्नल डिस्प्ले ला कनेक्ट केले जाऊ शकते. कनेक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला २ यूएसबी पोर्ट, १ मिनी HDMI पोर्ट, एक हेडफोन जॅक, ब्लूटूथ ५.० आणि ४जी ड्युअल बँड वाय-फाय मिळेल. यामध्ये ४००० mAh क्षमतेची बॅटरी मिळते. एकदा चार्ज केला की ८ तास टिकू शकतो असा रिलायन्सचा दावा आहे.

Story img Loader