Jio Recharge Plan News In Marathi : रिलायन्स जिओ ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर कंपनी आहे. जिओच्या ग्राहकांची संख्या ४६ कोटींहून अधिक आहे. कंपनी त्यांच्या ग्राहकांसाठी विविध प्रकारचा रिचार्ज प्लॅन ऑफर करते ज्यात अमर्यादित कॉलिंग, एसएमएस आणि डेटाचा समावेश असतो. सध्या सर्वांना ओटीटीची क्रेझ आहे. जिओने ओटीटी फायद्यांसह अनेक रिचार्ज पर्याय सुद्धा ग्राहकांसाठी आणले आहे. भारतातील टॉप एंटरटेनमेंट चॅनेलमध्ये झी आणि सोनी यांचा समावेश आहे.
जर तुम्ही Zee5 आणि SonyLiv चे सबस्क्रायबर असाल तर तुम्ही या प्लॅटफॉर्मवर मोफत सर्व काही कार्यक्रम पाहू शकता पण तुम्ही सबस्क्रायबर नसाल तर जिओचा हा रिचार्ज प्लॅन नक्की पाहा. हा एक विशिष्ट रिचार्ज प्लॅन आहे ज्याद्वारे Zee5 आणि SonyLiv दोन्ही प्लॅटफॉर्म ग्राहकांसाठी मोफत उपलब्ध आहे.
जिओचा १,०४९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन (Reliance Jio’s Cheapest Recharge Plan)
जिओचा हा प्लॅन ग्राहकांसाठी अत्यंत फायद्याचा ठरू शकतो. रिलायन्स जिओचा १,०४९ रुपयांचा प्लॅन ग्राहकांना अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, १०० एसएमएस/दिवस आणि २ जीबी दररोज डेटा एकूण ८४ दिवसांसाठी पुरवणार आहे. याशिवाय, या प्लॅनमध्ये ५० जीबी JioAI Cloud स्टोरेज आणि ९० दिवसांसाठी JioHotstar मोबाइल सबस्क्रिप्शनचा समावेश आहे. सबस्क्राइबर्सना JioTV मोबाइल अॅपद्वारे ZEE5 आणि SonyLIV चा अॅक्सेस सुद्धा या प्लॅनद्वारे मिळणार. एकदा युजर्सनी त्यांच्या फेअर यूज पॉलिसी (FUP) डेटा मर्यादेपर्यंत पोहोचले त्यानंतर इंटरनेट स्पीड 64 Kbps पर्यंत कमी होईल.
पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे जिओ सध्या मर्यादित काळासाठी JioHotstar चा फ्री देत आहे. हे प्रमोशन सुरुवातीला ३१ मार्च २०२५ रोजी संपणार होते, पण आता हे प्रमोशन १५ एप्रिल २०२५ पर्यंत वाढवण्यात आले आहे.
भारती एअरटेल, रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन आयडिया सारखे टेलिकॉम ऑपरेटर आता त्यांच्या वेबसाइटवर नेटवर्क कव्हरेज मॅप्स प्रदान करतात. हा बदल भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या आदेशानुसार आहे ज्यामुळे मोबाइल युजर्सना ऑनलाइन त्यांच्या नेटवर्कच्या उपलब्धतेबद्दल माहिती मिळू शकणे, सोपी जाईल.