Reliance Jio ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. कंपनीने देशामध्ये सर्वात पहिले ५जी नेटवर्क सुरु केले आहे. तसेच आता जिओने एक लॅपटॉप लॉन्च केला आहे. रिलायन्स कंपनीने आपला JioOS द्वारे समर्थित असलेला JioBook लॅपटॉप लॉन्च केला. हे ४ जी डिव्हाइस विद्यार्थ्यांसाठी आहे. तसेच जीओटीव्ही App द्वारे शैक्षणिक कंटेंटमध्ये प्रवेश देतो. या लॅपटॉपमध्ये एक मोठा ट्रॅकपॅड आहे.

जिओबुक लॅपटॉपमध्ये कंपनीने मॅट फिनिश दिले आहे. याचे वजन केवळ ९९० ग्रॅम आहे. हे MediaTek MT 8788 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे आणि यात ११.६ इंचाचा अँटी ग्लेअर HD स्क्रीन मिळते. तसेच यामध्ये ४जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. जे मायक्रोएसडी कार्ड स्लॉटच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत वाढवता येते.

Biggest Ola Season Boss Sale
मित्राने इलेक्ट्रिक स्कूटर घेतली, तर तुम्हाला ३००० रुपये मिळणार; पाहा कंपनीच्या Boss sale मध्ये काय ऑफर्स असणार?
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Samsung Galaxy S24 FE Pre booking Details
Samsung Galaxy : प्री-बुकिंग करा अन् सात हजार रुपयांचे डिस्काउंट मिळवा! किंमत, फीचर्स, व्हेरिएंटबद्दल जाणून घ्या
Samsung Fab Grab Fest sales information in marathi
Fab Grab Fest : स्मार्टफोन्सवर ५३ टक्के सूट; तर फ्रिजवर मायक्रोवेव्ह मोफत; वाचा सॅमसंगच्या सेलमध्ये आणखीन काय असणार ऑफर्स
Tata nexon cng launched
टाटाचा नाद करायचा नाय! नव्या अवतारात लॉन्च झाली ही सीएनजी कार, पॉवरफुल इंजिन अन् मायलेजसह किंमतही कमी
Sebi approves Hyundai and Swiggy IPOs print eco news
‘सेबी’कडून ह्युंदाई आणि स्विगीच्या महाकाय आयपीओंना मंजुरी; दोन्ही कंपन्यांकडून ३५,००० कोटींची निधी उभारणी अपेक्षित
Hyundai Venue Adventure Edition launch
Hyundai : शार्क-फिन अँटेना, डॅशकॅमसह बरीच फीचर्स; मार्केटमध्ये येतेय नवी SUV; किंमत फक्त…
bajaj housing finance ipo gets bids worth rs 3 25 lakh crore
Bajaj Housing Finance share: बजाज हाऊसिंग फायनान्सचा शेअर मिळाला तर गुंतवणूकदार होऊ शकतात मालामाल; वाचा कधी लिस्टिंग होणार?

हेही वाचा : Friendship Day 2023: तुमच्या जिवलग मित्र-मैत्रिणीला गिफ्ट करु शकता ‘ही’ स्वस्तात मस्त गॅजेट्स, पहा भन्नाट गिफ्ट आयडिया

जिओबुक हे HD वेबकॅमसह येते. तसेच हे वायरलेस स्कॅनिंग आणि प्रिंटिंगला सपोर्ट करते. तसेच हे एक्सटर्नल डिस्प्ले ला कनेक्ट केले जाऊ शकते. कनेक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला २ यूएसबी पोर्ट, १ मिनी HDMI पोर्ट, एक हेडफोन जॅक, ब्लूटूथ ५.० आणि ४जी ड्युअल बँड वाय-फाय मिळेल. यामध्ये ४००० mAh क्षमतेची बॅटरी मिळते. एकदा चार्ज केला की ८ तास टिकू शकतो असा रिलायन्सचा दावा आहे.

किंमत

रिलायन्सने नुकताच जिओबुक लॉन्च केला आहे. याची किंमत १६,४९९ रुपये आहे. ५ ऑगस्टपासून Amazon आणि रिलायन्स डिजिटल स्टोअरवर विक्री सुरू होणार आहे.