Reliance Jio ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. कंपनीने देशामध्ये सर्वात पहिले ५जी नेटवर्क सुरु केले आहे. तसेच आता जिओने एक लॅपटॉप लॉन्च केला आहे. रिलायन्स कंपनीने आपला JioOS द्वारे समर्थित असलेला JioBook लॅपटॉप लॉन्च केला. हे ४ जी डिव्हाइस विद्यार्थ्यांसाठी आहे. तसेच जीओटीव्ही App द्वारे शैक्षणिक कंटेंटमध्ये प्रवेश देतो. या लॅपटॉपमध्ये एक मोठा ट्रॅकपॅड आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिओबुक लॅपटॉपमध्ये कंपनीने मॅट फिनिश दिले आहे. याचे वजन केवळ ९९० ग्रॅम आहे. हे MediaTek MT 8788 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे आणि यात ११.६ इंचाचा अँटी ग्लेअर HD स्क्रीन मिळते. तसेच यामध्ये ४जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. जे मायक्रोएसडी कार्ड स्लॉटच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत वाढवता येते.

हेही वाचा : Friendship Day 2023: तुमच्या जिवलग मित्र-मैत्रिणीला गिफ्ट करु शकता ‘ही’ स्वस्तात मस्त गॅजेट्स, पहा भन्नाट गिफ्ट आयडिया

जिओबुक हे HD वेबकॅमसह येते. तसेच हे वायरलेस स्कॅनिंग आणि प्रिंटिंगला सपोर्ट करते. तसेच हे एक्सटर्नल डिस्प्ले ला कनेक्ट केले जाऊ शकते. कनेक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला २ यूएसबी पोर्ट, १ मिनी HDMI पोर्ट, एक हेडफोन जॅक, ब्लूटूथ ५.० आणि ४जी ड्युअल बँड वाय-फाय मिळेल. यामध्ये ४००० mAh क्षमतेची बॅटरी मिळते. एकदा चार्ज केला की ८ तास टिकू शकतो असा रिलायन्सचा दावा आहे.

किंमत

रिलायन्सने नुकताच जिओबुक लॉन्च केला आहे. याची किंमत १६,४९९ रुपये आहे. ५ ऑगस्टपासून Amazon आणि रिलायन्स डिजिटल स्टोअरवर विक्री सुरू होणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance launches jiobook 4g laptop in 16499 with jioos support check features tmb 01
Show comments