How To Book Tickets Online For Republic Day Parade : २६ जानेवारी २०२५ रोजी भारत आपला ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. याच दिवशी भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला. त्यामुळे हा प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे. या दिवशी प्रत्येक जण विविध कार्यक्रमाचे आयोजन करतात. पण, दिल्लीतील कर्तव्य पथ येथे प्रतिष्ठित परेडसह हा दिवस उत्साहात साजरा केला जातो. तर तुम्हालासुद्धा ही परेड बघायला जायचे असल्यास ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले आहे की, बीटिंग रिट्रीट समारंभ, परेड आणि संबंधित कार्यक्रमांसाठी तिकीट बुकिंग कालपासून सुरू झाली आहे, त्यामुळे तुम्ही तुमची तिकिटे ऑनलाइन किंवा ऑफलाइन सहजपणे बुक करू शकता.
सगळ्यात पहिले प्रजासत्ताक दिनानिमित्त असणाऱ्या कार्यक्रमाचे तिकीट काय असेल हे जाणून घेऊया…
- प्रजासत्ताक दिन परेड – १०० आणि २० रुपये प्रति तिकीट.
- बीटिंग रिट्रीट फुल ड्रेस रिहर्सल – २० रुपये प्रति तिकीट.
- बीटिंग रिट्रीट सेरेमनी – १०० रुपये प्रति तिकीट.
बुकिंग टाइम
ऑनलाइन तिकीट बुकिंग २ जानेवारी २०२५ पासून सुरू झाले असून ११ जानेवारीपर्यंत तुम्ही तिकीट बुक करू शकता. वर्षभरातून एकदा होणाऱ्या या विशेष परेडसाठी तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळ देण्यात आला आहे.
पोस्ट नक्की बघा…
घरबसल्या ऑनलाइन तिकीट कसे बुक कराल?
तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी तिकीट बुक करायचे असेल तर आता तुम्हाला त्रास होणार नाही, कारण तुम्ही ऑनलाइन तिकिटेसुद्धा बुक करू शकता. यासाठी तुम्हाला पुढील काही पायऱ्या फॉलो कराव्या लागतील…
१. अधिकृत वेबसाइटला भेट द्या : संरक्षण मंत्रालयाच्या http://www.aamantran.mod.gov.in या अधिकृत पोर्टलवर जा.
२. कार्यक्रम निवडा : तुम्हाला कोणता कार्यक्रम बघायचा आहे ते ठरवा आणि प्रजासत्ताक दिन परेड किंवा बीटिंग रिट्रीट कार्यक्रमासाठी तिकिटे निवडा.
३. डिटेल्स द्या : तुमचा आयडी आणि मोबाइल नंबर एंटर करा.
४. पेमेंट करा : तुम्ही किती तिकीट बुक करणार या संख्येवर आधारित पेमेंट ऑनलाइन पूर्ण करा.
मोबाइल ॲपद्वारे बुकिंग कसे करायचे?
१. गूगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवरून ‘आमंत्रण’ (Aamantran) ॲप डाउनलोड करा.
२. तुमची माहिती एंटर करा आणि तुम्हाला जो कार्यक्रम बघायचा आहे त्याचे तिकीट निवडा.
३. तुमचे बुकिंग पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन पेमेंट करा.
ऑफलाइन तिकीट बुकिंग
ज्यांना ऑफलाइन तिकीट बुक करायचे आहे, त्यांच्यासाठी दिल्लीत विविध ठिकाणी फिजिकल बूथ आणि काउंटर उभारण्यात आले आहेत. वैयक्तिकरित्या तिकिटे बुक करण्यासाठी, ओरिजिनल फोटो आयडीबरोबर ठेवा आणि या काउंटरवरून थेट तुमची तिकिटे खरेदी करा.