Amazon Republic Day sale 2025 Date : दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या काही दिवसांपूर्वी भारतातील सर्वांत लोकप्रिय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मकडून ‘रिपब्लिक डे सेल’ची (Republic Day sale) घोषणा केली जाते. तर, आता ॲमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्ट (Flipkart)ने त्यांच्या आगामी सेलची घोषणा केली आहे. ॲमेझॉनचा ‘ग्रेट रिपब्लिक डे सेल’ १३ जानेवारी रोजी नॉन-प्राइम युजर्ससाठी दुपारी सुरू होईल आणि प्राइम युजर्ससाठी तो १२ तासांपूर्वी सुरू होईल. फ्लिपकार्टचा ‘मोनुमेंटल सेल’ १४ जानेवारीपासून सुरू होईल आणि प्लस सदस्यांना एक दिवस आधी म्हणजे १३ जानेवारी रोजी सेलमध्ये प्रवेश मिळू शकेल. ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरील आगामी सेलमध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी खरेदी करता येतील ते जाणून घेऊ…
ॲमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल (Amazon Great Republic Day sale) –
ॲमेझॉनच्या ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये (Republic Day sale) ॲपल (Apple), आयक्यूओओ (iQOO), वनप्लस (OnePlus), सॅमसंग (Samsung) व शाओमी (Xiaomi) आदी ब्रॅण्ड्सच्या मोबाईल फोन, संबंधित ॲक्सेसरीजवर ४० टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. ई-कॉमर्स दिग्गज कंपनीच्या या सेलमध्ये नव्याने लाँच केलेले वनप्लस १३ (OnePlus 13), वनप्लस १३ आर (OnePlus 13R), आयक्यूओओ (iQOO 13), आयफोन १५ (iPhone 15) व गॅलॅक्सी एम ३५ (Galaxy M35) यांसारखे फोन कपात केलेल्या किमतीत मिळणार आहेत. तर, गॅलॅक्सी एस २३ अल्ट्रा (Galaxy S23 Ultra), ऑनर २०० (Honor 200) व Realme Narzo N61 सवलतीच्या दरात सेलमध्ये उपलब्ध असतील.
ॲमेझॉनच्या ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये (Republic Day sale) या सेलमध्ये स्मार्ट टीव्ही, गृहोपयोगी उपकरणे आणिव प्रोजेक्टरवर ६५ टक्क्यांपर्यंत सूट देत आहे. तर इयरफोन, स्मार्ट वॉच, माउस यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची किंमत या सेलमध्ये फक्त १९९ रुपयांपासून सुरू होईल. कंपनी निवडक अलेक्सा आणि फायर टीव्ही उत्पादने २,५९९ रुपयांना विकणार आहे.
फ्लिपकार्ट मोन्युमेंटल सेल (Flipkart Monumental Sale)
या सेलमध्ये फ्लिपकार्ट आयफोन १६ (iPhone 16) ६३,९९९ रुपयांना विकणार आहे, जो सध्या ७४,९०० रुपयांच्या विक्री किमतीपेक्षा खूप स्वस्त आहे. सॅमसंग गॅलॅक्सी एस २४ प्लस (Samsung Galaxy S24 Plus) ५९,९९९ रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. तर, ॲपल आयपॅड (Apple iPad) 1th Gen २७ हजार ९९९ रुपयांना सेलमध्ये उपलब्ध असेल.
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मनेदेखील पुष्टी केली आहे की, ग्राहकांनी फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक कार्ड वापरून खरेदी केल्यास त्यांना पाच टक्के रक्कम कॅशबॅक स्वरूपात मिळेल आणि ग्राहकांना इतर ब्रॅण्ड्सच्या इतर सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्मार्टफोन्सवर, तसेच लॅपटॉप, टीव्ही, टॅबलेट आणि घरगुती उपकरणे यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर सवलतदेखील मिळेल.