Republic Day Sale On Crome: प्रजासत्ताक दिनानिमित्त क्रोमामध्ये सेल जाहीर करण्यात आला आहे. या सेलमध्ये लॅपटॉप, मोबाइलसह अनेक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर मोठी सुट जाहीर करण्यात आली आहे. १९ जानेवारीला या सेलची सुरूवात झाली असुन हा सेल २९ जानेवारी २०२३ पर्यंत सुरू असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्रोमाकडुन वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर मोठी सुट जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये लॅपटॉप, स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, हेडफोन, स्पीकर, टॅबलेट्स अशा प्रोडक्ट्सचा समावेश आहे. अ‍ॅप्पल, सॅमसंग, डेल लिनोवो, एलजी, ओप्पो, रेडमी, एचपी या लोकप्रिय ब्रॅण्ड्सच्या प्रोडक्ट्सचा या सेलमध्ये समावेश आहे.

Amazon Sale 2023: अ‍ॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक सेलमध्ये अनेक वस्तूंवर भरघोस सूट, जाणून घ्या कधीपासून होणार सुरुवात

या सेलमध्ये काही प्रोडक्ट्सवर ५० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट जाहीर करण्यात आला आहे. तर काही स्टोअर्सवर ५००० रूपयांचा डिस्काउंट जाहीर करण्यात आला आहे. कूपन कोड आणि स्क्रॅच-अँड-विन कार्ड अशा आकर्षक ऑफर्सही असेल मध्ये देण्यात येत आहेत.

Amazon Great Republic Sale 2023: सर्वोत्तम स्मार्टफोन्सवर मिळतेय ‘इतकी’ सूट

सेलमधील आकर्षक ऑफर्स:

  • या सेलमध्ये कोर i3 लॅपटॉपची किंमत ३३,९९० रुपयांपासून सुरू होत आहे. तर इंटेलच्या गेमिंग लॅपटॉपची किंमत ५४,९९० पासून सुरू होत आहे.
  • विद्यार्थी आणि शिक्षकांना लॅपटॉपवर १० टक्के सुट देण्यात येत आहे.
  • सॅमसंगचे टीव्ही इन्स्टॉलमेंटमध्ये खरेदी करता येतील. सॅमसंगचा NEO QLED टीव्ही १,९९० रुपये प्रति महिना, ४००० रुपये प्रति महिना, एलइडी टीव्ही ९९० रुपये प्रति महिना आणि LG OLED टीव्ही २,९९९ रुपये प्रति महिना या किंमतीमध्ये उपलब्ध आहे.
  • वोल्टास ‘फोर इन वन इन्व्हरटर स्पिट एअर कंडिशनर २,९९९ रूपयांच्या इन्स्टॉलमेंटवर उपलब्ध आहे.
  • एक्वागार्ड आरओ प्लस युवी वॉटर प्युरीफायर १४,९९० रुपयांना उपलब्ध आहे. फ्रंट लोड वॉशिंग मशीन १९,९०० रुपयांना उपलब्ध आहे.
  • क्रोमाच्या ३०७ लिटर इन्व्हर्टर फ्रोस्टफ्री रेफ्रिजरेटरची किंमत २२,९९० रूपये आहे.
  • अ‍ॅप्पल एअरपॉड्स ८,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Republic day sale on croma big discounts on smartphones laptops and other electronic products check offer pns