Realme GT 6 Republic Day Sale : सणासुदीच्या काळात विविध कंपन्या ग्राहकांसाठी नवनवीन ऑफर्स घेऊन येत असतात. तर आता ‘रिपब्लिक डे सेल’ (Republic Day Sale) सुरू आहे. याचदरम्यान तुम्ही नवीन फोन घेण्याच्या विचारात असाल, तर रिअलमी तुमच्यासाठी खास ऑफर घेऊन आली आहे. रिअलमी जीटी ६ (Realme GT 6) गेमिंग स्मार्टफोनच्या किमतीत घट झाली आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस लाँच झालेला हा स्मार्टफोन १६ जीबीपर्यंत रॅम आणि ५१२ जीबी इंटर्नल स्टोरेजला सपोर्ट करतो. सध्या हे डिव्हाइस खरेदी करण्यासाठी सात हजार रुपयांची फ्लॅट सवलत आणि नो-कॉस्ट ईएमआय पर्यायांसारखे अतिरिक्त फायदेसुद्धा दिले जाणार आहेत.

रिअलमी जीटी ६ डिस्काउंट :

रिअलमी जीटी ६ हा स्मार्टफोन ८ जीबी रॅम + २५६ जीबी, १२ जीबी रॅम + २५६ जीबी, १६ जीबी रॅम + ५१२ जीबी अशा तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन रेझर ग्रीन व फ्लुईड सिल्व्हर या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. रिअलमीच्या वेबसाइटवर ‘रिपब्लिक डे सेल’ (Republic Day Sale) दरम्यान ग्राहक सहा हजार रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटचा आनंद घेऊ शकतात.

Sarang Punekar was a strong supporter of the Ambedkarite movement
Sarang Punekar : सावित्रीबाई फुले विद्यापीठातील उच्चशिक्षित तृतीयपंथीय विद्यार्थी सारंग पुणेकरची आत्महत्या, जयपूरमध्ये संपवलं आयुष्य
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
मुंबई : नायर रुग्णालयातील रोजंदारी कर्मचारी तीन महिने वेतनापासून वंचित, ७४ कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ
मुंबई : नायर रुग्णालयातील रोजंदारी कर्मचारी तीन महिने वेतनापासून वंचित, ७४ कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ
Uday Samant On Shivsena Thackeray group
Uday Samant : “ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार अन् काँग्रेसचे ५ आमदार…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “उद्या पहिला ट्रेलर…”
शिवसेना शिंदे गटात मोठी फूट पडणार? उदय सामंत यांच्या नावाची का होत आहे चर्चा? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : उदय सामंत हे एकनाथ शिंदेंना पर्याय ठरू शकतात का?
Mumbai Threat
Bomb Threat To School : मुंबईत खासगी शाळेत बॉम्बची धमकी; पोलिसांकडून परिसराची झडती
Dabur sues Patanjali over advertising dispute concerning chyawanprash claims.
Chyawanprash : च्यवनप्राशची लढाई पोहचली उच्च न्यायालयात, पतंजलीच्या जाहिरातीवर डाबरने घेतला आक्षेप
auto driver who helped saif ali khan says not able to work
सैफला रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षा चालकाने व्यक्त केली नाराजी; म्हणाला, “मी घाबरलोय कारण…”

विशेषत: तुम्ही हा फोन टॉप-टियर १६ जीबी रॅम + ५१२ जीबी स्टोरेज या व्हेरिएंटसह खरेदी केल्यास तुम्हाला १००० रुपयांची सूट (Republic Day Sale) मिळेल. त्यामुळे त्याची किंमत ३८ हजार ९९९ रुपयांपर्यंत खाली येऊ शकते. याव्यतिरिक्त कंपनी सहा हजार रुपयांपर्यंत बँक सवलत देत आहे; ज्यामुळे तुम्हाला तुमच्या खरेदीवर एकूण १३ हजार रुपयांपर्यंतची बचतही करता येईल. या सर्व ऑफरसह तुम्ही १६ जीबी रॅम + ५१२ स्टोरेजसह रिअलमी जीटी ६ स्मार्टफोन ३१ हजार ९९९ रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.

रिअलमी जीटी ६ फीचर्स :

क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8s Gen 3 प्रोसेसरद्वारे समर्थित हा फोन १६ जीबी LPDDR5X रॅम आणि ५१२ जीबी पर्यंत UFS 4.0 स्टोरेजसह सुसज्ज आहे. त्यात अत्याधुनिक GenAI फीचर्सदेखील समाविष्ट आहेत. त्याचबरोबर स्मार्टफोनमध्ये ६.७८ इंचांचा एफएचडी + अमोल्ड डिस्प्ले ६ हजार nits च्या प्रभावी पीक ब्राइटनेससह, युजर्सच्या स्मूथ अनुभवासाठी 120Hz च्या उच्च रिफ्रेश रेटसह येतो.

डिव्हाइस 120W सुपरव्हीओओसी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो आणि त्यात मजबूत 5,500mAh बॅटरी आहे. ॲण्ड्रॉइड १४ वर आधारित असलेला हा फोन रिअलमी यूआय ५ नुसार चालतो. स्मार्टफोनच्या मागील बाजूस ५० एमपी OIS कॅमेरा, ५० एमपी अल्ट्रा-वाइड लेन्स व ८ एमपी वाइड-अँगल कॅमेरा यांसह versatile ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी ३२ एमपी फ्रंट-फेसिंग कॅमेराही देण्यात आला आहे.

Story img Loader