बरेच जण आपला फोन रात्री झोपताना चार्जिंगला ठेवून झोपतात आणि सकाळी उठेपर्यंत तो तसाच चार्ज होत राहतो; परंतु आता ते दिवस गेले आहेत. आपल्या आयुष्यात ‘चार्जिंग किंवा ‘चार्जर’ला किती महत्त्व आलेय नाही का? फोन, लॅपटॉप, टॅबलेट, घड्याळ, कोणत्याही गोष्टीचा चार्जर असू दे किंवा थर्ड पार्टी चार्जर असू दे; तो किती पटापट चार्जिंग करतो हे फार महत्त्वाचे असते. आपल्याकडे असणाऱ्या डिव्हाइसमध्ये [ओरिजनल किंवा थर्ड पार्टी] असे चार्जर आहेत की, जे साधारण ५W ते १५०W इतक्या वेगाने चार्जिंग करू शकतात. एखादी पोर्टेबल पॉवर बँकदेखील १००W च्या गतीने एखादे डिव्हाइस सहज चार्ज करू शकते. आता केवळ अर्ध्या तासात ५०००mAh बॅटरीसह एखादे डिव्हाइस चार्ज करता येऊ शकते. चार्जिंग भरभर होणे वगैरे सर्व गोष्टी ठीक आहेत; पण चार्जिंग डिव्हाइस खरोखर काम करतेय का कसे समजणार?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
झटपट चार्जिंग होण्याच्या एवढ्या सोई-सुविधा आहेत. ही खूपच चांगली बाब आहे. पण, या सगळ्याचा खरोखर आपल्याला कितपत उपयोग होतोय हे कधीच प्रत्यक्षात बघता येत नाही. अगदीच कुणाला हे सर्व तपासून बघायची इच्छा असेलच, तर काही सेटिंग तपासून बघणे किंवा त्यासाठी अॅप डाऊनलोड करून, त्याद्वारे माहिती मिळवणे, असा सगळा द्राविडी प्राणायाम केल्याशिवाय आपल्याला त्यासंबंधी काही माहिती मिळत नाही. जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या चार्जरचा वापर करता किंवा थर्ड पार्टी चार्जरचा वापर करता, तेव्हा हे सर्व समजणे अजूनच अवघड होत असते.
हेही वाचा : Layoff नंतर काय करावे? मायक्रोसॉफ्टच्या माजी कर्मचाऱ्याचे ‘हे’ सल्ले पाहा…
या समस्येचे समाधान करण्यासाठी एक नवी कल्पना आल्याचे दिसते. त्यामध्ये एक चार्जिंग केबल आहे; ज्याला एक लहानसा एलसीडी लावण्यात आला आहे. त्यामधून आपले डिव्हाइस कोणत्या गतीने चार्ज होत आहे हे समजण्यास मदत होते. परंतु, या वस्तू परवडणाऱ्या किमतीत असतील, तर त्या नामांकित कंपन्यांच्या नसतात. त्यामुळे अशा गोष्टींवर कितपत विश्वास ठेवायचा याबाबत शंका निर्माण होते. याउलट नावाजलेल्या कंपनी, ब्रॅण्डची अशा स्वरूपाची उत्पादने खूप महाग असल्याने ती सर्वांना परवडणारी नसतात.
डिव्हाइस चार्ज करताना किती वेगाने चार्जिंग होतोय हे दाखवणारा चार्जर.
नाव ऐकूनच याबद्दल कुतूहल निर्माण होते. यूएसएएमएसच्या [USAMS] या ऍक्सेसरीज ब्रॅण्डच्या डिजिटल डिस्प्ले असणाऱ्या टाईप सी ते टाईप सी पीडी [Type-C to Type-C PD] केबलचे फारच कौतुक वाटते. या केबलच्या नावावरूनच ही नेमके काय काम करते तेसुद्धा समजते. ही एक टाईप सी टू टाईप सी केबल असून, याच्या कनेक्टरच्या टोकाला एक छोटा एलसीडी आहे; ज्यामध्ये डिव्हाइस किती वेगाने चार्ज होत आहे ते समजते. ही चार फूट लांबीची वायर असून, नायलॉनच्या लहान लहान वेण्या घातलेली याची वायर असल्याने ती मजबूत आणि लवचिक आहे. त्यामुळे ही केबल लवकर खराब होण्याची शक्यता नाही. त्यासोबतच ट्रान्स्परंट छोट्या डिस्प्लेमागे ती अगदी दिसेनाशी होते. याची किंमतदेखील सर्वसामान्यांना परवडणारी म्हणजेच केवळ ९०० ते ९५० रुपये इतकी आहे. ही किंमत इतर वायरपेक्षा फारच स्वस्त आहे.
आठवडाभर ही वायर वापरल्यानंतर ती अगदी सुरळीत काम करते असे द इंडियन एक्स्प्रेसच्या एका लेखावरून समजते. वन प्लस, शाओमी, पिजन यांसारख्या सर्व डिव्हाइसच्या चार्जरसोबत या केबलचा स्मार्टफोन, मॅकबुक एअर, आयपॅड यांसारख्या सर्व गोष्टींवर वापर करून पाहिल्यानंर ही केबल योग्य आकडे दाखवते, असेसुद्धा समजते. परंतु, यावरील आकडे काही वेळानंतर बदलू लागतात. त्यामुळे तुम्हालाही एखादे डिव्हाइस कोणत्या स्पीडने कधीपर्यंत चार्ज होऊ शकेल हे समजण्यास मदत होते. १००W चा चार्जर एखाद्या डिव्हाइसला शेवटपर्यंत १००W ने चार्ज करत राहणार नाही. तसेच काही डिव्हाइसच्या चार्जिंगची गती ही कमीच असते. त्यासोबतच ही पॉवर बँकसोबतही तसेच काम करते. १०W किंवा त्याहून कमी शक्ती असणाऱ्या नेहमीच्या / सामान्य पॉवर बँकेच्या तुलनेपेक्षा स्टाफकूल मेगा [३३W] ते अँबरने [६०W] या पॉवर बँकेमध्ये चार्जिंगची गती अधिक दर्शवते. परंतु, १००W च्या वरच्या गतीचे रीडिंग ही केबल करू शकत नव्हती. १२०W गतीचा चार्जिंग स्पीडदेखील १००W इतकाच दाखवीत असल्याचे समजते. केवळ चार्जिंग नव्हे, तर या केबलमधून ४८० एमबीपीएस गतीने डेटादेखील शेअर करता येऊ शकतो. केबलच्या दोन्ही टोकांना असलेले झिंक अलॉय [zinc alloy] हे कनेक्टर डिव्हाइसच्या टाईप सीच्या पोर्ट्समध्ये अगदी सहजतेने बसतात.
हेही वाचा : केवायसी (KYC) अपडेट करायला गेले आणि सर्व कमाई गमावून बसले हे आजोबा; काय आहे प्रकरण जाणून घ्या…
ही वायर केवळ मजबूत बनवलेली नसून, याची लांबीसुद्धा [चार फूट] अगदीच फायद्याची आहे. या वायरची लांबी फार जास्त नसल्याने तिचा गुंता होत नाही आणि ती अगदी सहजतेने टेबलाखाली असणाऱ्या इलेक्ट्रिक पॉइंट्सपर्यंत पोहोचू शकते. त्यासोबतच टेबलावर दोन डिव्हाइसना जोडण्यासाठीही याचा अगदी सहजतेने वापर करता येतो. सोबतच या वायरमधून अगदी पटापट डेटा शेअर करता येत असून, चार्जिंग स्पीडचे आकडे आणि स्पीड तपासणाऱ्या अॅप्सवर येणारे आकडे या दोन्हीमध्ये समानता असल्याचे द इंडियन एक्स्प्रेसच्या लेखातून समजते.
ज्यांना चार्जिंग स्पीडवर लक्ष ठेवायला आवडते अशांसाठी यूएसएएमएसची [USAMS] ९५० रुपयांची, टाईप सी टू टाईप सी पीडी १००W केबल; जी कधी कधी व्हेरिलॅक्स [Verilux] नावाच्या ब्रॅण्डखाली विकली जाते, ती घेणे फार फायद्याचे ठरू शकते. वर्षभरापूर्वीपर्यंत आयफोन वापरकर्त्यांना या केबलचा काहीच उपयोग झाला नसता. परंतु, आयफोन १५ च्या नवीन सीरिजमधील फोन्सना सी पोर्ट उपलब्ध करून दिल्याने त्यांनादेखील या केबलचा वापर करता येणे शक्य झाले आहे.