How To Use Roti Checker AI : सध्याचा काळ आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) आहे. एआयचा वापर जवळपास प्रत्येक क्षेत्रात केला जातो आहे. शिक्षण, नोकरी आणि आता स्वयंपाकघरातसुद्धा एआय हस्तक्षेप करण्यास सुरुवात करणार आहे. कारण- आता तुम्हाला पोळी किती चांगली लाटता येते या तुमच्या कौशल्याला एआय गुण (AI For Roti) देणार आहे. अनेकदा आई किंवा होणारी सासू आपल्याला पोळ्या गोल लाटता यायला पाहिजेत, असे आवर्जून सांगते आणि त्याला नकळत त्यांच्या शब्दात गुण देते. तर हेच काम आता एआय करणार आहे.
बंगळुरूच्या आयटी खरगपूर येथील विद्यार्थ्याने RotiChecker.al नावाचे एआय टूल (AI For Roti) विकसित केले आहे. हे नवीन एआय टूल पोळीच्या गोलाकाराचे मूल्यांकन करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच एआयचा वापर करते आणि १०० पैकी तुमच्या पोळीला किती गुण मिळणार हे सांगते. एखाद्याच्या पोळी बनवण्याच्या कौशल्याचे मूल्यांकन करण्यासाठी हे एक मजेदार टूल आहे, असे म्हणायला हरकत नाही.
RotiChecker.al एका सोशल मीडिया पोस्टमुळे उदयास आले. जेव्हा एका युजरने अगदी अभिमानाने तिच्या गोलाकार रोटीचा फोटो शेअर केला आणि “गोल पोळी बनवणेसुद्धा एक कला आहे” (गोल रोटी बनाना भी एक आर्ट हैे) अशी कॅप्शन दिली. तर याच पोस्टपासून प्रेरित होऊन अनिमेश चौहान यांनी RotiChecker.ai तयार केले. युजरने पोस्ट केलेल्या पोळीला एआय टूलने १०० पैकी ९१ गुण दिले आणि या टूलने (AI For Roti) पटकन लोकप्रियता मिळवली.
तर हे एआय टूल नक्की कसे काम करते (AI For Roti) ?
युजरने त्यांच्या लाटलेल्या पोळीचा फोटो RotiChecker.al वर अपलोड करायचा. त्यानंतर एआय पोळी किती गोल आहे याचे मूल्यांकन करते. त्यानंतर हे एआय टूल तुम्हाला १०० पैकी गुण देईल. तर अशा प्रकारे युजर्स त्यांच्या पोळी बनवण्याच्या कौशल्याचे मूल्यांकन करण्यासाठी एक मजेदार टूलची मदत घेऊ शकतात.
सोशल मीडियावर ही पोस्ट @animeshsingh38 या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. ’जर पोस्टला ४२० लाईक्स मिळाले, तर एआय लिंक सार्वजनिकरीत्या उपलब्ध करून देण्याचे आश्वासन अनिमेश चौहान यांनी कॅप्शनमध्ये दिले आहे.’ ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सच्या कमेंटनुसार RotiChecker.al ला मिळालेला प्रतिसाद बराच संमिश्र आहे. काही जणांना ते मनोरंजक, काहींना पाककौशल्ये दाखवण्याचा एक मजेदार मार्ग आणि इतरांकडून त्यांच्या कौशल्यावर प्रश्नचिन्हे उपस्थित होत आहेत, असेही वाटते आहे. तर, काहींनी अनिमेश चौहान यांना डोसा किंवा चाय यांसारख्या इतर खाद्यपदार्थांसाठीसुद्धा साधने तयार करण्याचे सुचवले आहे.