थंडीचा महिना आता संपला असून तीव्र उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. मार्च महिन्यापासूनच तीव्र उन्हाच्या झळा आता सोसाव्या लागत आहेत. या दिवसात पंख्याची गरम हवा येते म्हणून अनेक जण कुलर खरेदी करतात. पण कुलर घेतल्यानंतरही प्रत्येकाला एसी हवासा वाटतो. आता प्रत्येकाला एसी घेणं परवडत नाही, म्हणून एसी आणि कूलरची थंड हवा देणारा एक लक्झरी पंखा बाजारात उपलब्ध झाला आहे. या एका पंख्याची किंमत थोडी- थोडकी नाही तर तब्बल १६ हजार इतकी आहे. आता तुम्हालाही या पंख्यात एवढं काय खास आहे असा प्रश्न पडला असेल ना.. चला तर मग जाणून घेऊ हा पंखा इतका महाग का आहे आणि त्यात एवढं काय खास आहे?
ओरिएंट कंपनीने भारतात पहिला क्लाउट कूलिंग फॅन लॉन्च केला आहे. पंखा, कूलर आणि एसी या तीनही वस्तूंमधील वैशिष्ट्यं एका पंख्यात असल्याचा दावा कंपनीने केला आहे. याची किंमत १५९९९ रुपये इतकी आहे. हा पंखा ग्राहकांना अॅमेझॉनवरून कमी किमतीत खरेदी करता येतो.
क्लाउड चिल तंत्रज्ञानावर आधारित पंख्यामुळे एखाद्या खोलीचे तापमान १३ अंश सेल्सिअसने कमी करण्यास सक्षम आहे. ओरिएंट क्लाउड ३ पंखाकेवळ थंड हवाच देत नाही तर तुम्हाला उकाड्यातही थंडीचा फिल देतो. भारतीय घरांची रचना लक्षात घेऊन त्याची रचना करण्यात आली आहे. यामुळे तुमच्या घरांच्या इंटेरिअरनुसार हा पंखा सेट करू शकता. या पंख्यात काही पॅनल्स देण्यात आले आहेत ज्यातून क्लाउड्स बाहेर पडतात. यात ४ ते ५ लीटरचा वॉटर टँक बसवण्यात आला आहे ज्यातील पाणी ८ तासांपर्यंत टिकते. यातून बाहेर पडणाऱ्या क्लाउडसमोर तुम्हा हात ठेवला तर हाताला ओलावा जाणवणार नाही पण एसीसारखी थंड हवा जाणवेल.
यात एक इन बिल्ट क्लाउड चेंबर आहे ज्यात पाण्याचे क्लाउडमध्ये रुपांतर होते आणि थंड हवा बाहेर फेकली जाते. पंख्याचे ब्लेड ही हवा संपूर्ण खोलीत फिरवण्यास मदत करतात.
AC जास्त ताजी हवा न वापरता तिचं हवा थंड बाहेर सोडते. कूलरचा मोठ्याने आवाज होतो. तर छतावरील पंखा एसी आणि कूलरसारखी हवा देत नाही, त्यामुळे ओरिएंटचा कूलिंग Cloud3 पंखा या सर्व समस्यांवर एक उपाय असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
‘ओरिएंट क्लाउड ३’ ची वैशिष्ट्य
ओरिएंट क्लाउड ३ च्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात सायलेंट ऑपरेशन दिले गेले आहे म्हणजे यामुळे तुम्हाला पंख्यातून कोणताही आवाज ऐकू येणार नाही. हा रिमोट कंट्रोलवर चालणारा पंखा आहे. यासह यात एक ब्रीझ मोड देण्यात आला आहे जो संपूर्ण खोलीला आणखी थंड करतो. काळ्या आणि पांढऱ्या रंगात हा पंखा भारतात लाँच करण्यात आला आहे. सध्या Amazon वर मर्यादित काळासाठी तो उपलब्ध केला जाईल. त्यानंतर काही निवडक रिटेल आउटलेटवर उपलब्ध होईल.