आयफोन १४ प्रमाणे ‘सॅमसंग गॅलेक्सी एस२३’मध्येही सॅटेलाइट कनेक्शन मिळू शकते अशी चर्चा सुरू आहे. सॅमसंगचे नेक्स्ट जेन फ्लॅगशिप मॉडेल गॅलेक्सी एस२३ पुढच्या वर्षी म्हणजेच २०२३ ला फेब्रुवारीमध्ये लाँच होणार आहे. या मॉडेलमध्ये आयफोन १४ प्रमाणे सॅटेलाइट कनेक्शन असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सॅमसंगने नुकतीच इरडीअमबरोबर पार्टनरशिप केली आहे. ज्यामुळे हे फीचर ६६ (लो ऑरबीट कम्युनिकेशन) सॅटेलाइटच्या मदतीने अनेबल होईल. कोरीयामधील ‘इटी न्युज’ नुसार हे कनेक्शन तयार करण्यामध्ये अनेक अडथळे आले. यातील मुख्य अडथळा आरएफ अँटीना सामान्य स्मार्टफोनच्या क्षमतेसाठी लहान करणे, जेणेकरून त्यात सॅटेलाइट कनेक्शन येईल हा होता.
आणखी वाचा : व्हॉटसअॅपवरील Video Call रेकॉर्ड करायचाय? जाणून घ्या याच्या सोप्या स्टेप्स
काय आहे या फीचरचा उपयोग?
आयफोन १४ मध्ये उपलब्ध असणाऱ्या या फीचरचा वापार करून मोबाईल डेटा किंवा वायफाय कनेक्शनशिवाय इमर्जन्सी मेसेज पाठवता येऊ शकतात. यासाठी सॅटेलाइट कनेक्शन वापरले जाते. ही सुविधा ‘सॅमसंग गॅलेक्सी एस२३’ एका नव्या ॲडीशनसह उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ‘सॅमसंग गॅलेक्सी एस२३’मध्ये सॅटेलाइट कनेक्शन वापरुन डेटा किंवा वायफायशिवाय मेसेजसह फोटोही (लहान साईझचे) पाठवता येतील.