मोबाईलमधील तंत्रज्ञान अद्ययावत होत चालले आहे. कंपन्या नवनवीन फीचर असलेले फोन ग्राहकासांठी उपलब्ध करत आहेत. सॅमसंगने एक पाऊल पुढे जात नुकतेच बाजारात फोल्डेबल फोन्स उपलब्ध केलेत. मात्र, अ‍ॅपलकडे अद्याप असे फोन नाहीत. कंपनी २०२४ च्या जवळपास फोल्डेबल उपकरण आणणार असल्याची चर्चा आहे. मात्र, त्या आधीच अ‍ॅपलला फोल्डेबल तंत्रज्ञानाच्या अभावामुळे ट्रोलिंगला समोर जावे लागत आहे.

अ‍ॅडमधून अ‍ॅपलची घेतली मजा

अ‍ॅपलकडे फोल्डेबल फोन नसल्याचे हेरून सॅमसंगने आयफोनला ट्रोल केले आहे. सॅमसंगने ‘ऑन द फेन्स’ नावाने जाहिरात व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यामध्ये एक अ‍ॅपल युजर सॅमसंगद्वारे देण्यात आलेले फीचर तपासत आहे, तर दुसरा अ‍ॅपल युजर त्यास असे न करण्याचे सांगत आहे. त्यावर भिंतीवर चढलेला युजर सॅमसंगच्या नव्या फीचरविषयी माहिती सांगतो.

(भारतात प्रिमियम स्मार्टफोन विक्रीमध्ये अ‍ॅपल आघाडीवर, ‘हा’ आयफोन ठरला बेस्ट सेलर)

सॅमसंगकडे फोल्डेबल फोन्स आणि चांगले कॅमेरा फोन्स आहेत, असे भिंतीवर चढलेला दुसरा अ‍ॅपल युजर सांगतो. आपण वर्षभरापासून या फीचरची वाट पाहात आहोत, असे पहिला अ‍ॅपल युजर म्हणतो. त्यावर सॅमसंगकडे आधीच हे फीचर आहे, वाट कशाला पाहायची, अशी प्रतिक्रिया दुसरा युजर देतो. त्यावर आपण तेच करत आलो आहोत. आणि आपण वाटच पाहात राहू, असा टोमणा पहिला अ‍ॅपल युजर मारतो.

सॅमसंगने अनेकदा आपल्या जाहिरातीतून अ‍ॅपलची मजा घेतली आहे. अ‍ॅपलने बॉक्समधून चार्जर हटवल्यावरही सॅमसंगने मजा घेतली होती. अ‍ॅपलच्या ग्राहकांना नवीन फीचर्ससाठी वाट पाहावी लागते, यावरही सॅमसंगने थट्टा केली आहे. आता सॅमसंगच्या या अ‍ॅडवर अ‍ॅपल काय प्रतिक्रिया देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

(व्हॉट्सअ‍ॅपने ग्रुप, व्हिडिओ कॉलवरील सदस्य संख्या वाढवली, समान रुची असणाऱ्यांसाठी लाँच केले कम्युनिटी फीचर)

सॅमसंगकडे सर्वाधिक फोल्डेबल फोन

सॅमसंगकडे अनेक फोल्डेबल स्मार्टफोन्स आहेत. अ‍ॅपलही फोल्डेबल तंत्रज्ञानावर काम करत आहे. मात्र बाजारात फोल्डेबल आयफोन उपलब्ध करण्याबाबत आयफोनने कुठलेही संकेत दिलेले नाहीत.

Story img Loader