Samsung troll apple over foldable phone : फ्लिप तंत्रज्ञानावरून सॅमसंगने पुन्हा एकदा अ‍ॅपलला ट्रोल केले आहे. वर्ल्डकप थीमच्या जाहिरातीच्या माध्यमातून फ्लिप फोन नसल्याच्या कारणातून सॅमसंगकडून अ‍ॅपलची खिल्ली उडवण्यात आली. जाहिरातीतून सॅमसंगने अ‍ॅपलला तिच्या स्मार्टफोनमधील उणीव दाखवत आपल्या Samsung Galaxy Z Flip 4 या फ्लिप स्मार्टफोनचे प्रमोशन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मॅकरुमर्सच्या अहवालानुसार, जाहिरातीत सॅमसंग गॅलक्सी फ्लिप स्मार्टफोन हा स्टेडिअममध्ये फॅनसारखा दिसून येतो. स्टेडियमधील स्टँड्समध्ये सॅमसंगचा स्मार्टफोन आनंदात आणि फ्लिप स्थितीत दिसून येतो तर काही इतर स्मार्टफोन जे आयफोनसारखे दिसून येत असल्याचे मानले जाते प्रेक्षकांमध्ये डिस्प्लेवर निराश इमोजींसह गॅलक्सी फ्लिप स्मार्टफोन्सकडे पाहताना दिसून येतात.

सॅमसंगने वर्ल्डकप थीम असलेल्या जाहिरातीत फोल्डेबल आयफोन नसल्याबद्दल अ‍ॅपलची खिल्ली उडवली. इतकेच नव्हेत तर जाहिरातीच्या शेवटी ‘it is time to fold together’ असा संदेशदेखील देण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. हे नवे नाही. यापूर्वीही फ्लिप तंत्रज्ञानावरून सॅमसंगने अ‍ॅपलला ट्रोल केले आहे.

(Heart fail कधी होणार? या बाबत काही आठवड्यांपूर्वीच कळणार! ‘या’ तंत्रज्ञानाची जगात चर्चा, असे करते काम)

पण त्यांच्याकडे असा फोन नाही..

अ‍ॅपलकडे फोल्डेबल फोन नसल्याचे हेरून सॅमसंगने आयफोनला ट्रोल केले होते. सॅमसंगने ‘ऑन द फेन्स’ नावाने जाहिरात व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. यामध्ये एक अ‍ॅपल युजर सॅमसंगद्वारे देण्यात आलेले फीचर तपासताना दिसून येतो, तर दुसरा अ‍ॅपल युजर त्यास असे न करण्याचे सांगतो. त्यावर भिंतीवर चढलेला युजर सॅमसंगच्या नव्या फीचरविषयी माहिती सांगतो.

सॅमसंगकडे फोल्डेबल फोन्स आणि चांगले कॅमेरा फोन्स आहेत, असे भिंतीवर चढलेला दुसरा अ‍ॅपल युजर सांगतो. आपण वर्षभरापासून या फीचरची वाट पाहात आहोत, असे पहिला अ‍ॅपल युजर म्हणतो. त्यावर सॅमसंगकडे आधीच हे फीचर आहे, वाट कशाला पाहायची, अशी प्रतिक्रिया दुसरा युजर देतो. त्यावर आपण तेच करत आलो आहोत. आणि आपण वाटच पाहात राहू, असा टोमणा पहिला अ‍ॅपल युजर मारतो.

(Instagram account उघडत नाहीये? ‘Hack’तर झाले नाही ना?खाते परत मिळवण्यासाठी तातडीने करा ‘हा’ उपाय)

सॅमसंगने अनेकदा आपल्या जाहिरातीतून अ‍ॅपलची मजा घेतली आहे. अ‍ॅपलने बॉक्समधून चार्जर हटवल्यावरही सॅमसंगने मजा घेतली होती. अ‍ॅपलच्या ग्राहकांना नवीन फीचर्ससाठी वाट पाहावी लागते, यावरही सॅमसंगने थट्टा केली आहे.

सॅमसंगकडे सर्वाधिक फोल्डेबल फोन

सॅमसंगकडे अनेक फोल्डेबल स्मार्टफोन्स आहेत. अ‍ॅपलही फोल्डेबल तंत्रज्ञानावर काम करत आहे. मात्र बाजारात फोल्डेबल आयफोन उपलब्ध करण्याबाबत आयफोनने कुठलेही संकेत दिलेले नाहीत.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samsung again troll apple over foldable phone in an advertisement ssb
Show comments