Samsung Exciting Festive Offers on Galaxy Z Fold6 and Z Flip6 : सॅमसंग हा भारतातील सर्वांत मोठा इलेक्ट्रॉनिक्स ब्रॅण्ड आहे. सॅमसंगने १० जुलैला गॅलॅक्सी अनपॅक (Galaxy Unpacked) इव्हेंटमध्ये स्मार्टफोनची गॅलॅक्सी झेड फोल्ड ६ (Galaxy Z Fold 6) आणि गॅलॅक्सी झेड फ्लिप ६ (Galaxy Z Flip 6) ही मॉडेल्स सादर केली. हा कंपनीचा सिक्स्थ जनरेशन (सहाव्या पिढीतील) फोल्डेबल स्मार्टफोन आहे. तर याच स्मार्टफोनवर आता कंपनीने ऑफरची घोषणा केली आहे. काय असणार आहे ऑफर चला जाणून घेऊ…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सणानिमित्त मर्यादित कालावधीच्या ऑफरचा एक भाग म्हणून Samsung आजपासून Galaxy Z Fold6 खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अपग्रेड बोनस किंवा ११,००० च्या बँक कॅशबॅकसह २४ महिने नो-कॉस्ट ईएमआय, त्याचप्रमाणे Galaxy Z Flip6 खरेदी करणाऱ्या ग्राहकांना २४ महिने नो-कॉस्ट ईएमआयसह अपग्रेड बोनस किंवा ११,००० चा बँक कॅशबॅक दिला जाईल.
Galaxy Z Fold6 ची किंमत १,६४,९९९ पासून, तर Galaxy Z Flip6 ची किंमत १,०९,९९९ पासून आहे. त्यामुळे ग्राहक Galaxy Z Flip6 साठी ३,०५६ पासून, तर गॅलॅक्सी झेड फोल्ड६ साठी ४,५८४ रुपयांपासून सुरू होणाऱ्या सोईस्कर ईएमआय योजनांचा लाभ घेऊ शकतात.
हेही वाचा…AI च्या क्षेत्रात आघाडी घेण्यासाठी गुगलने धरले माजी कर्मचाऱ्याचे पाय, अब्जोवधींना घेतली कंपनी विकत
एका वर्षात दोन क्लेम्सचा लाभ :
याव्यतिरिक्त Samsung Galaxy Z Fold6 किंवा Galaxy Z Flip6 खरेदी करणाऱ्या ग्राहकांना Galaxy Z ॲश्युरन्स फक्त ९९९ रुपयांमध्ये मिळेल. संपूर्ण डिव्हाइस संरक्षण देणाऱ्या गॅलॅक्सी झेड ॲश्युरन्स प्रोग्रामची मूळ किंमत गॅलॅक्सी झेड फोल्ड६ साठी १४,९९९ रुपये आणि गॅलॅक्सी झेड फ्लिप६ साठी ९,९९९ रुपये होती. झेड ॲश्युरन्स प्रोग्रामअंतर्गत ग्राहक आता एका वर्षात दोन क्लेम्सचा लाभ घेऊ शकतात.
Samsung चे नवीन फोल्डेबल्स स्मार्टफोन हे आतापर्यंतचे सर्वांत सडपातळ, सर्वांत हलके Galaxy Z सिरीजमधील फोन आहेत आणि स्ट्रेट एजेस डिझाइनसह ते आपल्यासमोर येतात. Galaxy Z सिरीज आर्मर ॲल्युमिनियम, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस २ ने सुसज्ज आहे आणि त्यामुळे ही Galaxy Z सीरिज आतापर्यंतची सर्वांत टिकाऊ आहे. Galaxy Z Fold6 आणि Flip6 हे Galaxy साठी स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ मोबाईल प्लॅटफॉर्मसह सुसज्ज आहेत. यातील प्रोसेसर AI प्रक्रियेसाठी ऑप्टिमाइज केलेला आहे.
Galaxy Z Fold6 मध्ये स्क्रीन मोठी करण्यासाठी – नोट असिस्ट, कंपोजर, स्केच टू इमेज, इंटरप्रिटर, फोटो असिस्ट व इन्स्टंट स्लो-मो AI वर चालणारी फीचर्स आणि टूल्सची रेंज ऑफर करते. गॅलॅक्सी झेड फोल्ड६ मध्ये दीर्घकाळपर्यंत गेमचा आनंद घेण्यासाठी १.६ पट मोठी वेपर चेंबर आहे आणि रे ट्रेसिंग त्याच्या ७.६-इंच स्क्रीनवर वास्तविक ग्राफिक्सचा अनुभव देते, जे अधिक सर्वोत्तम गेमिंग अनुभवासाठी जवळपास २,६०० नीट्सचा तेजस्वी डिस्प्ले देते.
त्याचप्रमाणे FlexCam आता नवीन ऑटो झूमसह आले आहे; जेणेकरून शॉट्ससाठी सर्वोत्कृष्ट फ्रेमिंग तयार करण्यासाठी विषय ओळखून आणि कोणतीही आवश्यक वस्तू झूम इन आणि आउट करता येईल. नवीन ५० मेगापिक्सेल वाइड आणि १२ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड सेन्सर्स सुस्पष्ट व आकर्षक फोटोंसह अपग्रेडेड कॅमेऱ्याचा अनुभव देतात. गॅलॅक्सी झेड फ्लिप६ आता अधिक बॅटरी क्षमतेसह येतो आणि पहिल्यांदाच त्यामध्ये वेपर चेंबर आहे.
गॅलॅक्सी झेड फोल्ड६ आणि झेड फ्लिप६ ला सॅमसंग गॅलॅक्सीचे (Samsung) डिफेन्स-ग्रेड सॅमसंग नॉक्सचे संरक्षण देण्यात आले आहे. हे मल्टी-लेअर सिक्युरिटी प्लॅटफॉर्म महत्त्वपूर्ण माहितीचे संरक्षण करण्यासोबत एण्ड-टू-एण्ड हार्डवेअर, रिअल-टाइम थ्रेट डिटेक्शन व कोलॅबोरटिव्ह प्रोटेक्शनसह असुरक्षित बाबींपासून संरक्षण करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. गॅलॅक्सी झेड फोल्ड६ आणि झेड फ्लिप६ सर्व आघाडीच्या ऑनलाइन व ऑफलाइन रिटेल शॉपमध्ये उपलब्ध आहेत.