Samsung ही एक लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी आहे. Samsang कंपनीने कमी कालावधीमध्ये लोकप्रिय झालेल्या ChatGpt , Bard आणि Bing या ai टूल्स वर बंदी घातली आहे. कर्मचाऱ्यांकडून या ai टूलवर कंपनीचे काही संवेदनशील कोड्स लीक झाल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. याआधी इटली या देशाने एक महिन्यासाठी ChatGpt वर बंदी घातली होती.

दक्षिण कोरियाची कंपनी यांसाऱ्या Samsung ने सोमवारी आपल्या सर्वात मोठ्या विभागांमधील एक विभागाच्या कर्मचाऱ्यांना सूचित केले आहे. डॉक्युमेंटनुसार Google Bard आणि Bing सह ChatGpt आशा ai वर प्रसारित केलेला डेटा बाहेरील सर्व्हरवर सांगरीहीत केला जातो. ज्यामुळे तो पुनः मिळवणे किंवा डिलिट करणे कठीण असते. तसेच तो इतर वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होतो. याबाबतचे वृत्त ब्लूमबर्गने दिले आहे.

ChatGPT now has its own web search engine
OpenAI’s Search Engine : OpenAI चे नवे सर्च इंजिन! अचूक माहिती शोधणे होणार सोपे; विनामूल्य करता येईल वापर
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
IAS Whatsapp Group Controversy
IAS Whatsapp Group Controversy : IAS अधिकाऱ्याच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून मोठा गोंधळ; केरळ सरकार करणार चौकशी, तर फोन हॅक झाल्याचा अधिकाऱ्याचा दावा
Oben Electric confirms Rorr EZ Launch Date
Oben Electric Rorr EZ : आता बदलतं तापमान सहन करणार तुमची इलेक्ट्रिक बाईक; ‘या’ दिवशी होणार लाँच, पाहा कसे असतील फीचर्स
Singham Again OTT Release
‘सिंघम अगेन’ कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार? जाणून घ्या
chhagan bhujbal on manoj jarange decision to not contest maharashtra assembly election spb 94
मनोज जरांगेंची विधानसभा निवडणुकीतून माघार; छगन भुजबळ म्हणाले, “हा निर्णय म्हणजे…”
smartphone and career
तुमचा स्मार्टफोन पाहा- गरज ओळखून शिका… किंवा शिकलेले विसरा!
vidya balan reveals kartik aaryan love life
कार्तिक आर्यन मिस्ट्री गर्लला करतोय डेट. भर शोमध्ये विद्या बालनने केली पोलखोल; म्हणाली, “फोनवर बोलताना…”

हेही वाचा : Reliance Jio ने लॉन्च केलं ‘हे’ डिव्हाईस, घरबसल्या घेता येणार IPL चा स्टेडियमसारखा आनंद; जाणून घ्या किंमत अन्…

कंपनीने गेल्या आठवड्यामध्ये AI उपकरणांच्या अंतर्गत वापराबाबत एक सर्वेक्षण केले. त्यात असे सांगण्यात आले, ६५ टक्के उत्तरदात्यांना असा विश्वास आहे की अशा सेवा सुरक्षेला धोका निर्माण करतात. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला samsang कंपनीच्या इंजिनिअर्सनी चुकून काही इंटर्नल सोर्स कोड ChatGpt वर अपलोड करून लीक केले होते.तथापि, माहितीमध्ये काय समाविष्ट आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि सॅमसंगने त्यावर बोलण्यास नकार दिला आहे.

Samsung ने आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितले ChatGpt सारख्या AI टूल्समध्ये अंतर्गत आणि बहिर्गत रुची वाढत आहे. ही रुचि प्लॅटफॉर्मच्या उपयुक्ततेवर आणि कार्यक्षमतेवर अवलंबून असते, मात्र AI मुळे सुरक्षेबद्दल देखील चिंता वाढल्या आहेत. रिपोर्टनुसार सॅमसंगने आपल्या मालकीच्या असणारे कॉम्प्युटर, टॅबलेट आणि फोनसह इंटर्नल नेटवर्कसाठी सुद्धा AI च्या वापरावर बंदी घातली आहे.

हेही वाचा : VIDEO: ‘या’ दिवशी होणार Google चा सर्वात मोठा इव्हेंट, Android 14 सह लॉन्च होणार…; जाणून घ्या

मागील वर्षी ओपनएआयने आपला ChatGpt हा AI चॅटबॉट लॉन्च केला आहे. या AI चा सध्या अनेक ठिकाणी वापर सुरु आहे. तसेच या चॅटबॉटशी स्पर्धा करण्यासाठी अनेक कंपन्या आपल्या AI वर काम करत आहेत. OpenAI चे AI टूल ChatGPT इतके लोकप्रिय झाले आहे की निबंध लिहिल्यानंतर, परीक्षा दिल्यानंतर आणि तुम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर आता ChatGPT चा वापर जपानमध्ये सरकार चालवण्यासाठी देखील केला जाणार आहे.