सध्या टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये खूप मोठ्या घडामोडी सुरू आहेत. जागतिक आर्थिक मंदीमुळे अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. Amazon आणि Flipkart चा समर सेल सुरू आहे. देशाच्या सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारने १४ मोबाईल अॅप्स भारतात ब्लॉक केले आहेत. हे सर्व मेसेंजर अॅप्स आहेत. या अॅप्सचा वापर दहशतवादी कारवाया करण्यासाठी केला जात होता. पाकिस्तानमधून दहशतवाद्यांना संदेश पाठवण्यासाठी या अॅप्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता. तसेच अनेक नवीन स्मार्टफोन लॅान्च हॉट आहेत. स्मार्ट टीव्ही, स्मार्टवाचेस , फोनवर सेलमध्ये बंपर ऑफर मिळत आहेत. आज आपण मागील आठवड्यामध्ये टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये काय-काय घडामोडी झाल्या आहेत ते जाणून घेणार आहोत.
केंद्र सरकारने घातली १४ Apps वर बंदी
देशाच्या सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारने १४ मोबाईल अॅप्स भारतात ब्लॉक केले आहेत. हे सर्व मेसेंजर अॅप्स आहेत. या अॅप्सचा वापर दहशतवादी कारवाया करण्यासाठी केला जात होता. पाकिस्तानमधून दहशतवाद्यांना संदेश पाठवण्यासाठी या अॅप्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता. या १४ अॅप्समध्ये Crypviser, Enigma, Safeswiss, Wickrme, Mediafire, Briar, BChat, Nandbox, Conion, IMO, Element, Second line, Zangi आणि Threema चा समावेश आहे.
सॅमसंगने ChatGpt चॅटबॉट वापरण्यास कर्मचाऱ्यांवर घातली बंदी
Samsung ही एक लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी आहे. Samsang कंपनीने कमी कालावधीमध्ये लोकप्रिय झालेल्या ChatGpt , Bard आणि Bing या ai टूल्स वर बंदी घातली आहे. कर्मचाऱ्यांकडून या ai टूलवर कंपनीचे काही संवेदनशील कोड्स लीक झाल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. याआधी इटली या देशाने एक महिन्यासाठी ChatGpt वर बंदी घातली होती.
Motorola ने लॉन्च केला नवीन स्मार्टफोन
मोटोरोला ही मोबाइल फोन्सची निर्मिती करणारी भारतातील लोकप्रिय कंपनी आहे. या कंपनीने त्यांच्या प्रोडक्ट रेंजमधील सर्वात दमदार फ्लॅगशिप फोन ‘ Edge Plus 2023’ जागतिक बाजारपेठेमध्ये अधिकृतरित्या लॉन्च केला आहे. हा फोन भारतामध्ये लॉन्च केला जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मोटोरोलाच्या या स्मार्टफोनची किंमत भारतीय चलनानुसार ६५,००० हजार रुपये इतकी आहे. हा नवा फोन सॅमसंग, अॅप्पलच्या प्रीमियम फोन्सना टक्कर देऊ शकतो असे म्हटले जात आहे.
Cognizant आणि Messho ने केली कर्मचाऱ्यांची कपात
जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत Cognizant ने आपल्या ३,५०० कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. खर्च कमी करण्यासाठी कंपनी आपली काही ऑफिसेस देखील बंद करणार आहे. कॉग्निझंट ही टेक कंपनी अमेरिकेमधील कंपनी आहे.
मीशो कंपनीने देखील आपल्या कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. मीशो या कंपनीने आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी १५ टक्के कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच कंपनीने २५१ कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. कंपनीचे Ceo विदित आत्रे यांनी एका इमेलच्या माध्यमातून याची माहिती दिली आहे. कंपनीला अधिक फायदा मिळवून देण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी इमेलमध्ये लिहिले आहे. सतत फायदा मिळवण्यासाठी आमहाला लहान संघटनात्मक संरचनांसोबत काम करायचे आहे असेही आत्रे म्हणाले.
गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वेच्या बुकिंगला सुरुवात
लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी दरवर्षी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. यंदा गणपतीचे आगमन १९ सप्टेंबर २०२३ ला होणार आहे. गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखरूप व्हावा, यासाठी आधीचे रेल्वेने विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्यांचे आरक्षण अर्थात बुकिंग येत्या १६ मेपासून रेल्वेचे बुकिंग सुरू होणार आहे.
अमेरिकेत Cyber Attack
अमेरिकन शहरात डलासमध्ये एकाच वेळी अनेक रॅन्समवेअर हल्ले करण्यात आले. या सायबर हल्ल्यात अनेक सरकारी खात्यांच्या अकाउंट्सना टार्गेट करण्यात आले. हल्ल्यात ज्या संगणक सर्व्हरला टार्गेट करण्यात आले त्यात पोलीस विभागाची साइट देखील होती.
डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म असणाऱ्या PhonePe ने आपले UPI Lite हे फिचर सर्वांसाठी सुरु केले आहे. हे सर्व प्रमुख बँकांद्वारे समर्थित फिचर असून देशभरातील सर्व व्यपाऱ्यांकडे UPI आणि QR स्वीकारले जाते. ही सुविधा ‘ऑन-डिव्हाइस’ बॅलन्सद्वारे चालते ज्यामध्ये कमी किंमतीच्या व्यवहारांसाठी अतिशय वेगवान रिअल टाइम पेमेंटची सुविधा देते. UPI LITE हे फीचर वापरकर्त्यांना कमी किंमतीचे पेमेंट करण्याची परवानगी देते. वापरकर्ते या फीचरच्या माध्यमातून २०० रुपयांपर्यंतचे पेमेंट पिन न टाकता देखील एका क्लिकवर करू शकणार आहेत. हे नियमित UPI व्यवहारांपेक्षा अधिक सोपे आणि वेगवान व्यवहार करते.