होळीच्या सणांनिमित्त जर तुम्ही तुमच्या घरासाठी काही नवीन उपकरणे खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सॅमसंग तुम्हाला या कामात मदत करू शकते. कारण सॅमसंगचे ऑनलाइन स्टोअर आणि सर्व रिटेल स्टोअर्स स्मार्ट टीव्ही, वॉशिंग मशीन आणि फ्रीज यांसारख्या अनेक उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहेत. दरम्यान सॅमसंगच्या ‘ब्लू फेस्ट’ या सेलमध्ये या ऑफर देण्यात येत आहे. चला तर मग या सेलमध्ये समाविष्ट असलेल्या ऑफर आणि डील्सवर एक नजर टाकूया.

सॅमसंगचा ‘ब्लू फेस्ट’ सेल

१२ मार्चपासून सॅमसंगने ‘ब्लू फेस्ट’ सेलची घोषणा केली आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या घरगुती उपकरणांवर जबरदस्त सूट दिली जात आहे. सॅमसंगची ही विशेष विक्री ३० एप्रिल २०२२ पर्यंत सुरू राहील आणि यामध्ये तुम्हाला झटपट सवलत मिळेल आणि अतिरिक्त कॅशबॅक तसेच सुलभ EMI आणि शून्य डाउनपेमेंट पर्याय दिले जातील.

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
77 lakh fraud by cyber thieves, lure of investment ,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून ७७ लाखांची फसवणूक
Energy Booster Powder
अशक्तपणा दूर करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्या घरच्या घरी बनलेली एनर्जी बूस्टर पावडर
Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
Tire killer is going to be tested in three important areas of Thane railway station area
स्थानक परिसरात लवकरच ‘टायर किलर’

स्वस्तात खरेदी करा स्मार्ट टीव्ही आणि एसी

‘ब्लू फेस्ट’ दरम्यान, तुम्ही जर Samsung Neo QLED, QLED आणि Crystal 4K UHD टीव्ही खरेदी करू इच्छिता तर तुम्हाला या प्रीमियम श्रेणी २५ टक्के पर्यंत झटपट सवलत, तसेच २० टक्यांपर्यंत अतिरिक्त कॅशबॅक आणि शून्य डाउनपेमेंट यासारख्या सुलभ पेमेंट पर्यायांसह खरेदी करता येणार आहे. AC बद्दल सांगायचे तर, विंडफ्री एअर कंडिशनर्स खरेदी करताना, तुम्हाला २० टक्यांपर्यंत कॅशबॅक, ९९० रुपयांची सुरुवातीचा EMI आणि पाच वर्षांची कॉम्प्रीहेन्सिव वॉरंटी यासारख्या वैशिष्ट्यांचा लाभ घेऊ शकता.

वॉशिंग मशीन आणि फ्रीजवरही सवलत आहे

जर तुम्ही चांगली वॉशिंग मशिन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर AI EcoBubble Front Load Washing Machine रेंज २९,९०० रुपयांच्या विशेष किमतीत खरेदी केली जाऊ शकते. एवढेच नाही तर, या डीलमध्ये तुम्ही २० टक्के कॅशबॅक, शून्य डाउनपेमेंट आणि ९९० रुपयांच्या पहिल्या EMI पासून सुरू होणारे फायदे देखील मिळवू शकता.

दरम्यान अशा ऑफर्स तुम्हाला फ्रीजवरही मिळतील. डिजी-टच कूल ५-इन-१ सिंगल डोअर रेफ्रिजरेटर १६,७०० रुपयांच्या आकर्षक किमतीत खरेदी केले जाऊ शकते ज्यामध्ये तुम्हाला १० टक्यांपर्यंत कॅशबॅक तसेच ९९० रुपयांची EMI आणि शून्य डाउनपेमेंट सारखे पर्याय देखील मिळतील.

सॅमसंगचा हा ब्लू फेस्ट सेल ३० एप्रिल २०२२ पर्यंत सॅमसंगच्या ऑनलाइन स्टोअरमध्ये आणि देशातील सर्व लहान-मोठ्या रिटेल स्टोअरमध्ये लाइव्ह असेल.

Story img Loader