Samsung Fab Grab Fest is back : आता वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये शर्यत लागलेली दिसते आहे. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, शाओमीनंतर आता भारतात सर्वांत मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रॅण्ड असलेल्या सॅमसंग कंपनीने सेलची घोषणा केली आहे. सॅमसंगच्या या सेलचं नाव ‘फॅब ग्रॅब फेस्ट’ (Fab Grab Fest), असे आहे. या सेलमध्ये गॅलॅक्सी स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉप, ॲक्सेसरीज, वेअरेबल, टेलिव्हिजन, डिजिटल उपकरणे, स्मार्ट मॉनिटर्सवर आकर्षक डील, कॅशबॅक अशा ऑफर्स देण्यात आल्या आहेत. या ऑफर्सचा केंद्रबिंदू ‘बाय मोअर सेव्ह मोअर’ (Buy More Save More) असा असणार आहे. जिथे ग्राहक दोन किंवा अधिक उत्पादने खरेदी करताना पाच टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सवलत मिळवू शकतात.

बाय मोअर सेव्ह मोअरचा एक भाग म्हणून…

१. गॅलॅक्सी झेड फोल्ड ६ (Galaxy Z Fold6) खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ऑफरव्यतिरिक्त १२४९ रुपयांमध्ये गॅलॅक्सी बड्स एफई (Galaxy Buds FE) मिळू शकतात. त्याचप्रमाणे गॅलॅक्सी बुक ४ (Galaxy Book4) खरेदी करणाऱ्यांना फक्त १९२० रुपयांमध्ये FHD फ्लॅट मॉनिटर खरेदी करता येईल. जेव्हा ग्राहक BESPOKE Family Hub फ्रिज खरेदी करतात, तेव्हा त्यांना कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय एक कन्व्हेक्शन मायक्रोवेव्ह दिला जाईल. तसेच, जेव्हा ग्राहक Neo QLED 8K स्मार्ट टेलिव्हिजन खरेदी करतात, तेव्हा त्यांना Q-Symphony साउंडबार मिळतो. म्हणजेच या उत्पादनांसह अतिरिक्त भेटवस्तूही तुम्हाला मिळणार आहेत.

Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Jai-Veeru Swiggy's entry on Dalal Street welcomed by Zomato
“जय-वीरू!” दलाल स्ट्रीटवर स्विगीची एन्ट्री, झोमॅटोने केलं स्वागत! पाहा, Netflix, Amazon, Paytm, Coca Colaची भन्नाट प्रतिक्रिया
car purchased on loan joke
हास्यतरंग :  एक कार…
High Severity Alert For Apple Users
High Severity Alert For Apple Users : ॲपल युजर्सना मोठा धोका? लीक होऊ शकतात पर्सनल डिटेल्स; तुमचा फोन ‘या’ यादीत आहे का तपासा
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल
desi jugaad video old fridge convert into shoe rack
बाबो! खराब फ्रीजचा असा वापर तुम्ही आयुष्यात कधी पाहिला नसेल; Video पाहून युजर्सनी मारला कपाळावर हात

२. ‘फॅब ग्रॅब फेस्ट’ (Fab Grab Fest) दरम्यान, ग्राहकांना गॅलेक्सी झेड सीरिज, गॅलेक्सी एस सीरिज व गॅलेक्सी ए सीरिज स्मार्टफोन्सच्या निवडक मॉडेल्सवर ५३ टक्के, गॅलॅक्सी बुक ४ (Galaxy Book4) सीरिज लॅपटॉप मॉडेलवर २७ टक्के, तर टॅब ९ व टॅब एस९ सीरिज, बड्स ३ सीरिज, गॅलॅक्सी वॉच सीरिज या मॉडेल्सवर ७४ टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे.

हेही वाचा…Xiaomi Diwali With Mi : रेडमीच्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळणार सहा हजारांची सूट; सेलच्या ऑफर्स, डिस्काउंटची ‘ही’ यादी पाहाच

३. सॅमसंग स्मार्ट टेलिव्हिजन – Neo QLED 8K, Neo QLED, QLED, द फ्रेम आणि Crystal 4K UHD, फ्रीस्टाईल प्रोजेक्टरवर ४३ टक्के सूट, निवडक ५५ इंच आणि त्यावरील मॉडेल्स खरेदी करणाऱ्या ग्राहकांना विनामूल्य सॅमसंग स्मार्ट टेलिव्हिजन किंवा साउंडबार मोफत दिला जाईल. सॅमसंग निवडक ३२ आणि त्याहून अधिक स्मार्ट टेलिव्हिजन मॉडेल्सवर ३ वर्षांची वॉरंटी विनामूल्य देते आहे. त्याचप्रमाणे सॅमसंगच्या निवडक स्मार्ट आणि गेमिंग मॉनिटर्सवर ग्राहकांना १००० रुपयांपर्यंत त्वरित कार्ट सूटदेखील दिली जाईल.

४. त्यानंतर ‘फॅब ग्रॅब फेस्ट’ (Fab Grab Fest), मध्ये फ्रेंच डोअर रेफ्रिजरेटरवर ३९ टक्के सूट, डिजिटल इन्व्हर्टर कॉम्प्रेसरवर २० वर्षांची वॉरंटी, आठ किलो व त्यापेक्षा जास्त वजन असणाऱ्या फ्रंट लोड आणि टॉप लोड वॉशिंग मशीनव, डिजिटल इन्व्हर्टर मोटरवर २८ टक्के आणि २० वर्षांची वॉरंटी दिली जाईल. तर ९ किलो फुल्ली ऑटोमॅटिक फ्रंट-लोडिंग वॉशिंग मशीनवर २००० पर्यंत इन्स्टंट कार्ट डिस्काउंट दिली जाईल.

५. निवडक स्मार्टफोन, टॅबलेट, वेअरेबल, लॅपटॉप खरेदी करताना जर ग्राहकांनी आयसीआयसीआय, एचडीएफसीचे डेबिट, क्रेडिट कार्ड वापरले, तर त्यांना ४० टक्के कॅशबॅक आणि निवडक स्मार्ट टेलिव्हिजन, डिजिटल उपकरणे खरेदी करताना ग्राहकांनी आयसीआयसीआय, एचडीएफसी, एसबीआयचे डेबिट, क्रेडिट कार्ड वापरलं, तर त्यांना २२.५ टक्के कॅशबॅकसुद्धा दिली जाऊ शकते. याआधी कधीही नसलेल्या Fab Grab Fest या ऑफरचा लाभ तुम्ही Samsung.com, Samsung Shop App व Samsung Exclusive Stores वर घेऊ शकणार आहात.