भारतातील सुप्रसिद्ध सॅमसंग या इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडची नवीन स्मार्टफोन सीरिज या महिन्यात लॉन्च होणार हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र, आता या फोनचे प्री-रिझर्व्ह करता येणार आहे, असे सॅमसंग कंपनीने दिलेल्या माहितीनुसार समजते. त्यानुसार, ज्या ग्राहकांनी हे स्मार्टफोन प्री-रिझर्व्ह केले आहेत, त्यांना नवीन गॅलेक्सी डिव्हाईस खरेदी करताना अनेक ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे, असे देखील समजते.

ग्राहकांना अत्यंत वेगळा आणि नवीन अनुभव या नव्या गॅलेक्सी स्मार्टफोनमधून मिळणार आहे. नव्या युगातील सॅमसंग गॅलेक्सीचे नवीन इनोव्हेशन तुमच्या दैनंदिन जीवनात स्मार्टफोन वापरण्याचा, कनेक्ट आणि क्रिएट करण्याचा संपूर्ण अनुभवामध्ये बदल करण्यासाठी सज्ज आहे. नवी गॅलेक्सी एस सीरिज ही आतापर्यंतची सर्वात बुद्धिमान/इंटेलिजंट अनुभव देणारी स्मार्टफोन सीरिज ठरणार आहे. त्यामुळे ग्राहकांना दररोज नवीन काहीतरी शिकण्यास मिळेल, असे सॅमसंग कंपनीने सांगितले आहे. सॅमसंग गॅलेक्सीच्या पहिल्या फ्लॅगशिपपासून पुढील प्रत्येक फ्लॅगशिपमध्ये ग्राहकांसाठी त्यांनी सातत्याने नाविन्यपूर्ण बदल केले असून; आर अँड डी आणि मजबूत गुंतवणुकींच्या जोरावर सॅमसंग गॅलेक्सीचा या नवीन जनरेशनच्या फ्लॅगशिपसोबत महत्त्वाचे इनोव्हेशन्स आणि बदल घडवून आणण्याचा प्रयत्न आहे.

Mumbai Municipal Corporation Debris on Call service for household level construction waste collection goes online Mumbai
घरगुती स्तरावरील बांधकामाचा कचरा वाहून नेण्यासाठी मुंबई महापालिकेची ‘डेब्रीज ऑन कॉल’ सेवा ऑनलाईन
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
How will state boards mobile app be useful for students parents and teachers
राज्य मंडळाचे मोबाइल अॅप विद्यार्थी, पालक, शिक्षकांना कसे ठरणार उपयुक्त?
bajaj chetak electric launch date price in marathi
Bajaj Chetak Electric Scooter : वर्षाच्या शेवटी बजाजचा मोठा धमाका; नवीन इलेक्ट्रिक चेतक स्कूटर होणार लाँच, जाणून घ्या वैशिष्ट्ये
Yamaha NMax 125 Tech Max scooter Details
NMax 125 Scooter :Yamaha ने सादर केली नवीन टेक मॅक्स स्कूटर, बाईकला टक्कर देणारे जबरदस्त फीचर्स; पण भारतात लाँच होणार का?
Senior citizens mobile phone stolen in front of Narayan Peth police post
नारायण पेठ पोलीस चौकीसमोर ज्येष्ठाचा मोबाइल चोरीला
Mumbai, Metro Worli, Mumbai, Metro Mumbai,
मुंबई : मार्चपासून मेट्रोची धाव वरळीपर्यंतच

हेही वाचा : Samsung Galaxy S24 : लॉन्चआधीच फीचर्स झाले लीक? काय असणार आहे या स्मार्टफोनमध्ये खास जाणून घ्या…

या स्मार्टफोनच्या काही फीचर्सबद्दल थोडक्यात जाणून घेऊ

Galaxy S24 आणि S24+ या दोन्ही स्मार्टफोनमध्ये Exynos 2400 चिप किंवा Snapdragon 8 Gen 3 वापरण्यात येणार आहे. तर गॅलेक्सी S24 अल्ट्रा हा स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 3 वापरणार असल्याची सगळीकडे चर्चा असल्याचे गॅजेट ३६० डिग्रीच्या एका लेखातून समजते. त्यासोबतच हा स्मार्टफोन युरोपियन प्रदेशांमध्ये Exynos 2400 चिपसेटवर काम करतील; तर इतर प्रदेशांच्या बाजारात Snapdragon 8 Gen 3 SoC स्पेसिफिकेशनचे स्मार्टफोन्स उपलब्ध असतील. त्याचबरोबर सर्व प्रदेशांमध्ये सॅमसंगच्या S24 अल्ट्रा पॉवरबाय Qualcomm Snapdragon 8 Gen 3 SoC असणार असल्याचा अंदाज आहे.

सॅमसंग गॅलेक्सी सीरिजचे अनपॅकिंग कधी आणि कुठे होणार?

अमेरिकेत कॅलिफोर्नियामधील, सॅन जोसमध्ये सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स आपल्या नव्या सीरिजचे अनपॅकिंग करणार आहे. भारतातील ग्राहक या नवीन गॅलेक्सी सीरिजचे सॅमसंगच्या अधिकृत वेबसाईट [Samsung.com], सॅमसंग एक्‍सक्‍लुझिव्‍ह स्‍टोअर्स, Amazon.in आणि भारतामधील सर्व लिडिंग आउटलेट्स यामध्ये प्री-बुकिंग करू शकतात. यासाठी ग्राहकांना २००० रुपयांचे टोकन भरावे लागेल; मात्र त्यानंतर त्यांना ५००० रुपयांचा फायदा होणार आहे.

हेही वाचा : Samsung Galaxy चे ‘हे’ स्मार्टफोन झाले चक्क ‘१० हजारांनी’ स्वस्त! पाहा नवीन फोन घेण्याआधी ही यादी….

१७ जानेवारी रोजी, ११.३० या भारतीय वेळेनुसार सॅमसंग इलेक्ट्रॉनिक ब्रँड, सॅन जोसमध्ये आपल्या सॅमसंग गॅलेक्सीच्या नेक्स्ट जनरेशन फ्लॅगशिपचे अनपॅकिंग करणार आहे. ग्राहकांना पॉवर्डबाय AI असणाऱ्या या नवीन प्रीमियम गॅलेक्सी इनोव्हेशनचे लाईव्ह अनपॅकिंग पाहायचे असल्यास Samsung.com, सॅमसंग न्यूजरूम इंडिया, तसेच सॅमसंगच्या युट्यूब चॅनेलवर पाहता येणार आहे.

सॅमसंगच्या येणाऱ्या सर्व नवनवीन टीझर्स, ट्रेलर्स आणि सॅमसंग गॅलेक्सी ॲपकिंग २०२४ च्या बातम्यांसाठी News.samsung.com/india भेट द्या.

Story img Loader