स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने गॅलेक्सी ए सीरिजमध्ये अनेक पॉवरफुल फोन सादर केले आहेत. आता कंपनी या मालिकेत आणखी एक फोन आणणार आहे. या फोनमध्ये १०८ एमपी कॅमेरा तसेच फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि मजबूत बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने अलीकडेच याच सेगमेंटमध्ये Galaxy A23, Galaxy A13 आणि Galaxy A72 सादर केले. आता या मालिकेत Samsung Galaxy A73 5G आणखी येणार आहे.

कंपनी या महिन्यात Galaxy A33 5G आणि Galaxy A53 5G देखील सादर करणार आहे. Samsung Galaxy A73 चे डिटेल्स समोर आले आहेत. मोबाईल लीकर @Onleaks द्वारे प्रथम दर्शविलेल्या या फोनमध्ये Galaxy A53 पेक्षा अधिक चांगला स्क्रीन-टू-बॉडी रेशो असल्याचे म्हटले जाते.

Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Documentary, Solving Puzzles, Puzzles,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: कोडे सोडवण्याची गंमत…
Bengaluru man kills son Over mobile
‘तू मेलास तरी फरक पडत नाही’, मोबाइलचं व्यसन जडलेल्या लहान मुलाचा वडिलांनीच केला निर्घृण खून
ठाणे : पोलिसांकडून आता ड्रोनद्वारे पाहाणी
humanity exists in mumbai
मुंबईत खरंच माणुसकी आहे! रिक्षाचालकाने हरवलेला फोन परत आणून दिला, नेटकरी म्हणाले, “मुंबईचे लोक खूप प्रामाणिक आहे…”
korean spy and zombie movies ott a hard day
झॉम्बीजचा भयानक थरार ते गुप्तहेरांच्या गूढ कथा, OTT वरील ‘या’ वेब सीरिज पाहून उडेल थरकाप

Samsung Galaxy A73 डिटेल्स
या सॅमसंग फोनला १०८०×२४०० पिक्सेल रिझोल्यूशनसह ६-७ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हे AMOLED, 90Hz रिफ्रेश रेटसह येण्याची शक्यता आहे. हे Android 4 वर आधारित One UI 12 द्वारे समर्थित आहे. यात Qualcomm SM7225 Snapdragon 750G 5G प्रोसेसर आहे. सध्या हा फोन ८ GB रॅम आणि १२८ GB व्हेरिएंटमध्ये येईल असे सांगितले जात आहे.

आणखी वाचा : Affordable Smartphones : अवघ्या ३ हजार रूपयांत मिळतात Micromax, Samsung, Tecno आणि Lava कंपनीचे स्मार्टफोन्स

कॅमेरा
या फोनमधील प्रायमरी कॅमेरा f/ १.८ सह १०८ MP आहे. f/२.४ (टेलिफोटो सेन्सर) सह ८ MP, f/२.२ सह १२ MP अल्ट्रा-वाइड सेन्सर प्रदान केला आहे, जो १२३˚ पर्यंत कव्हर करू शकतो. याशिवाय आणखी एक मायक्रो कॅमेरा ५ MP चा f/२.४ अपर्चर सह देण्यात आला आहे. तर सेल्फी साठी f/२.२ अपर्चर सह ३२ MP कॅमेरा देण्यात आला आहे.

फिचर्स आणि कनेक्टिव्हिटी
कनेक्टिव्हिटी या ऑप्शनमध्ये 5G, Bluetooth v5.0, USB Type-C 2.0, Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac, ड्युअल-बँड, Wi-Fi डायरेक्ट, हॉटस्पॉट, GPS, NFC आणि रेडिओ यांचा समावेश आहे. फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर यात फिंगरप्रिंट (अंडर डिस्प्ले, ऑप्टिकल), एक्सेलेरोमीटर, गायरो, प्रॉक्सिमिटी, कंपास देण्यात आले आहेत.

बॅटरी
सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये Li-Ion 5000 mAh बॅटरीसह 33W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. हा फोन ब्लॅक आणि इतर रंगांमध्ये उपलब्ध असेल. हे Samsung Galaxy A72 चे अपडेटेड व्हर्जन असेल.