सॅमसंग या लोकप्रिय मोबाइल उत्पादक कंपनीने भारतात आपला Galaxy F34 5G हा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. स्मार्टफोनच्या महत्वाच्या फीचर्समध्ये ६००० mAh क्षमतेची बॅटरी, १२० Hz AMOLED डिस्प्ले आणि ५० ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि Exynos १२८० चिपसेट यांचा समावेश आहे. आज आपण या लॉन्च झालेल्या नवीन फोनच्या फीचर्स, किंमत आणि प्री-ऑर्डर बद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Samsung Galaxy F34 5G : स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग गॅलॅक्सी F34 5G मध्ये वापरकर्त्यांना ६.४६ इंचाचा S-AMOLED डिस्प्ले मिळणार आहे. ज्याचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका आहे. तसेच यात कम्पनी १०० नीट्स पर्यंत पीक ब्राइटनेस ऑफर करतो. तसेच हा फोन Exynos 1280 SoC द्वारे समर्थित आहे. फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज ऑफर करण्यात आले आहे. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित One UI 5.1 वर चालतो. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

हेही वाचा : VIDEO: भारतात लॉन्च झाले पहिले 5G वायरलेस वाय-फाय, ‘या’ शहरांमधील वापरकर्त्यांना होणार फायदा

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये वापरकर्त्यांना ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. ज्यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सरचा समावेश आहे. रिअर कॅमेरा हा फीचरसह येतो. ज्यामुळे वापरकर्त्यांना एका शॉटमध्ये ४ व्हिडीओ आणि ४ फोटो कॅप्चर करता येतात. सेल्फीसाठी स्मार्टफोनमध्ये १३ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळणार आहे.

बॅटरीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास स्मार्टफोनमध्ये ६००० mAh क्षमतेची बॅटरी मिळते. ज्याला २५ W फॅट्स चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. यामध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि चार्जिंग टाइप-सी पोर्ट येतो.

Samsung Galaxy F34 5G: किंमत, ऑफर्स आणि प्री-ऑर्डर

सॅमसंग Galaxy F34 5G दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १८,९९९ रुपये तर ८/१२८ व्हेरिएंटची किंमत २०,९९९ रुपये आहे. हा स्मार्टफोन तुम्ही इलेक्ट्रिक ब्लॅक आणि मिस्टिक ग्रीन कलर व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा सॅमसंगचा नवीन स्मार्टफोन फ्लिपकार्ट, अधिकृत सॅमसंग वेबसाइट आणि निवडक रिटेल स्टोअर्सद्वारे प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. सॅमसंग Galaxy F34 5G ११ ऑगस्ट पासून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. फोनवरील ऑफर्सच्या बाबतीत बोलायचे झाल्यास खरेदीदारांना ICICI बँक आणि Kotak बँकेच्या कार्डवर १,००० रूपयांचा झटपट डिस्काउंट मिळेल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samsung galaxy f34 5g launch india s amoled display and android 13 flipkart pre order check price tmb 01