नुकत्याच लाँच झालेल्या सॅमसंग गॅलेक्सीच्या नव्या सीरिजमध्ये कंपनीने, Samsung Galaxy S24, S24 Ultra, S24+ असे तीन फोन ग्राहकांसाठी बाजारात आणलेले आहे. ज्यांना हे नवे स्मार्टफोन विकत घ्यायची इच्छा असेल, त्यांच्यासाठी ३१ जानेवारीपासून प्री बुकिंगदेखील सुरू होणार आहे. या सीरिजमधील S२४ हे साधारण किंवा बेसिक मॉडेल असून S२४ अल्ट्रा हे प्रीमियम मॉडेल आहे.

या तीनही मॉडेल्सच्या केवळ दिसण्यामध्ये आणि किमतीमध्ये फरक नसून याचे सर्व फीचर्ससुद्धा भन्नाट आणि वेगळे आहेत. काय आहेत या तीनही मॉडेलमधल्या विविधता पाहा आणि तुम्हाला सर्वात उपयोगी पडणारा फोन कोणता असेल ते ठरवा.

Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
Royal Enfield electric bike breaks cover globally royal enfield electric bike price features latest update
Royal Enfield ची पहिलीवहिली इलेक्ट्रीक बाईक लाँच; जबरदस्त लूक, फिचर्स अन् किंमत लगेच जाणून घ्या
Korea Masters Badminton Tournament Kiran George in semifinals sport news
कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा: किरण जॉर्ज उपांत्य फेरीत
young mans mobile was stolen
पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकाविला
JEE Advanced 2025 New Eligibility Rules
JEE Advanced 2025 : जेईई ॲडव्हान्स्डच्या विद्यार्थ्यांना आता तीन वेळा देता येणार परीक्षा; आजच करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
maharashtra assembly election 2024 Candidates mobile call whatsapp call
उमेदवार दक्ष ! मोबाईल नाहीच, ओन्ली व्हॉटसअ‍ॅप कॉल

हेही वाचा : Optimus robot घालतोय कपड्यांच्या घड्या; पाहा एलॉन मस्कने शेअर केलेला ‘हा’ भन्नाट व्हिडीओ….

१. Samsung Galaxy S24

डिस्प्ले आणि स्क्रीन –
या स्मार्टफोनमध्ये ६.२४ इंचाची, AMOLED, FHD+ फ्लॅट स्क्रीन बसवण्यात आली आहे. याचा रिफ्रेश रेट १२०Hz आणि २,६०० nits ब्राईटनेस आहे.

रॅम आणि स्टोरेज
८ GB रॅम + १२८ GB स्टोरेज आणि ८ GB रॅम + २५६ GB स्टोरेज असे दोन मॉडेल्स उपलब्ध आहेत.

कॅमेरा
उत्तम फोटो काढण्यासाठी यामध्ये ५०MP मुख्य कॅमेरा असून, १२MP अल्ट्राव्हाईड आणि १०MP टेलिफोटो ३x ऑप्टिकल झूमसह बसवण्यात आली आहे, तर व्हिडीओ कॉल आणि सेल्फीसाठी १२MP फ्रंट कॅमेरा दिलेला आहे.

बॅटरी
यामध्ये बराचवेळ टिकेल अशी ४,०००mAh इतक्या शक्तीची बॅटरी बसवलेली आहे.

किंमत – ७९,९९९ रुपयांपासून सुरू होणार आहे

२. Samsung galaxy S24 plus

डिस्प्ले आणि स्क्रीन –
या स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाची, AMOLED, QHD+ फ्लॅट स्क्रीन बसवण्यात आली आहे. याचा रिफ्रेश रेट १२०Hz आणि २,६०० nits ब्राईटनेस आहे.

रॅम आणि स्टोरेज
१२ GB रॅम + १२८ GB स्टोरेज आणि १२ GB रॅम + २५६ GB स्टोरेज असे दोन मॉडेल्स उपलब्ध आहेत.

कॅमेरा
उत्तम फोटो काढण्यासाठी यामध्ये ५०MP मुख्य कॅमेरा असून, १२MP अल्ट्राव्हाईड आणि १०MP टेलिफोटो ३x ऑप्टिकल झूमसह बसवण्यात आली आहे, तर व्हिडीओ कॉल आणि सेल्फीसाठी १२MP फ्रंट कॅमेरा दिलेला आहे.

बॅटरी
यामध्ये बराचवेळ टिकेल अशी ४,९००mAh इतक्या शक्तीची बॅटरी बसवलेली आहे.

किंमत- ९९,९९९ रुपयांपासून सुरू होणार आहे

३. Samsung galaxy S24 Ultra

डिस्प्ले आणि स्क्रीन –
या स्मार्टफोनमध्ये ६.८ इंचाची, AMOLED, QHD+ फ्लॅट स्क्रीन बसवण्यात आली आहे. याचा रिफ्रेश रेट १२०Hz आणि २,६०० nits ब्राईटनेस आहे.

रॅम आणि स्टोरेज
१२ GB रॅम + २५६ GB स्टोरेज आणि १२ GB रॅम + ५१२ GB आणि १२ GB रॅम + १ TB स्टोरेज असे तीन मॉडेल्स उपलब्ध आहेत.

कॅमेरा
उत्तम फोटो काढण्यासाठी यामध्ये २००MP मुख्य कॅमेरा असून, १२MP अल्ट्राव्हाईड आणि ५०MP टेलिफोटो ५x ऑप्टिकल झूम, तसेच १०MP टेलिफोटो कॅमेरा ३x ऑप्टिकल झूमसह बसवण्यात आली आहे, तर व्हिडीओ कॉल आणि सेल्फीसाठी १२MP फ्रंट कॅमेरा दिलेला आहे.

बॅटरी
यामध्ये बराचवेळ टिकेल अशी ५,०००mAh इतक्या शक्तीची बॅटरी बसवलेली आहे.

किंमत – १,२९,९९९ रुपयांपासून सुरू होणार आहे

मात्र, या तीनही व्हेरियंटमध्ये असणाऱ्या गॅलेक्सी एआय [Galaxy AI] मध्ये कोणताही फरक नसणार आहे. कीबोर्ड, बाऊझरमध्ये असिस्ट आणि चॅट असिस्ट हे फीचर्स स्मार्टफोनचा वापर सुकर होण्यासाठी वापरकर्त्यांना मदत करू शकतील. सर्कल टु सर्च [Circle to Search] या फीचरची सर्वात चर्चा होत आहे. या फीचरमध्ये तुम्हाला जे सर्च करायचे आहे किंवा शोधायचे आहे त्याला स्क्रीनवर सर्कल करून शोधू शकता, अशी माहिती हिंदुस्थान टाइम्सच्या एका लेखावरून समजते.