सॅमसंगने गेल्या आठवड्यात भारतात आपली Samsung Galaxy M13 सीरिज बंद केली. Samsung Galaxy M13 5G आणि Galaxy M13 4G स्मार्टफोन २३ जुलैच्या रात्री १२ वाजल्यापासून प्राइम डे २०२२ मध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. Samsung Galaxy M13 स्मार्टफोनमध्ये Exynos 850 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसंच हा फोन MediaTek Dimensity 700 प्रोसेसर 5G व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. Samsung Galaxy M13 सीरिजमध्ये ५० मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सर आणि १५ W फास्ट चार्जिंग सारखी फीचर्स उपलब्ध आहेत. या दोन्ही सॅमसंग डिव्हाईसमध्ये Android 12 आधारित OneUI उपलब्ध आहे. Samsung Galaxy M13 ची किंमत, लॉंच ऑफर्स, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स बद्दल सर्व काही जाणून घेऊया…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Samsung Galaxy M13 and Galaxy M13 5G Price in India
Samsung Galaxy M13 आणि Galaxy M13 5G स्मार्टफोन्स Amazon वर प्राइम डेज सेलमध्ये खास उपलब्ध करून दिले आहेत. लॉंच ऑफरचा एक भाग म्हणून कंपनी सॅमसंग गॅलेक्सी M13 सीरिज डिव्हाइसेसवर १००० रुपयांची झटपट सूट देत आहे.
आणखी वाचा : IRCTC वेबसाईटवरून घरबसल्या Tatkal Ticket बुक करा, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, Galaxy M13 चा ४ GB रॅम आणि ६४ GB स्टोरेज व्हेरिएंट ११,९९९ रुपयांना लॉंच करण्यात आला आहे तर ६ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज व्हेरिएंट १३,९९९ रुपयांना लॉंच करण्यात आला आहे.
तसंच Samsung Galaxy M13 5G च्या ४ GB रॅम आणि ६४ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १३,९९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट १५,९९९ रुपयांमध्ये येतो. Galaxy M13 सीरिज मिडनाईट ब्लू, एक्वा ग्रीन आणि स्टारडस्ट ब्राउन रंगात मिळू शकते.
Samsung Galaxy M13 5G Specifications
Samsung Galaxy M13 5G मध्ये ६.५ इंचाचा HD + LCD डिस्प्ले आहे. स्क्रीनचे रिझोल्यूशन १६००×७२० पिक्सेल आहे आणि रीफ्रेश रेट ९० Hz आहे. स्मार्टफोनमध्ये octa-core MediaTek Dimensity 700 प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी Mali G57 GPU आहे. हँडसेटमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. Galaxy M13 5G मध्ये ड्युअल-रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सल प्रायमरी आणि २ मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आहे. या सॅमसंग फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. हँडसेटमध्ये १५ W फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० mAh बॅटरी आहे.
Galaxy M13 5G मध्ये टाइप-सी चार्जिंग पोर्ट, एज-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर, मायक्रो-एसडी कार्ड स्लॉट आणि ३.५ मिमी ऑडिओ जॅक आहे. स्मार्टफोनचे वजन १९५ ग्रॅम आहे. फोनची परिमाणे १६४.५ × ७६.५× ८.८ मिमी आहेत. हँडसेटमध्ये Wi-Fi, Bluetooth, GPS, GLONASS सारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स आहेत.
आणखी वाचा : स्वस्तात मिळत आहेत Moto G51, Moto G60 आणि Moto G71 स्मार्टफोन, Flipkart Big Saving Days वर उत्तम ऑफर
Samsung Galaxy M13 Specifications
Samsung Galaxy M13 स्मार्टफोन २४०८×१०८० पिक्सेल रिझोल्यूशनसह ६.६ इंचाचा फुलएचडी+ एलसीडी डिस्प्ले दाखवतो. संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये octa-core Exynos 850 चिपसेट आणि ग्राफिक्ससाठी Mali G52 GPU आहे. फोनमध्ये ४ GB आणि ६ GB रॅमसह ६४ GB आणि १२८ GB स्टोरेज ऑप्शन आहेत.
कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर Galaxy M13 स्मार्टफोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये एपर्चर एफ/१.८ सह ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-एंगल आणि २ मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर देखील आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये ६००० mAh बॅटरी आहे जी १५ W चार्जिंगला सपोर्ट करते.
Galaxy M13 मध्ये microSD कार्ड स्लॉट, Type-C चार्जिंग पोर्ट, फिंगरप्रिंट स्कॅनर आणि ३.५ mm ऑडिओ जॅक सारखी फीचर्स आहेत. फोनचे वजन २०७ ग्रॅम आहे आणि आकारमान १६५.४ × ७६.९× ९.३ मिमी आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, डिव्हाइसमध्ये ड्युअल-सिम, 4जी, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि ग्लोनास सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.