Samsung लवकरच आपला Galaxy M33 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च करू शकतो, हा स्मार्टफोन M सीरीजचा नवा कोरा स्मार्टफोन असेल, जो एप्रिल 2022 च्या पहिल्या आठवड्यात लॉन्च केला जाऊ शकतो. Samsung Galaxy M33 5G स्मार्टफोन सॅमसंगच्या Galaxy M32 4G स्मार्टफोनची अपडेटेड वर्जन असेल. हा स्मार्टफोन कंपनीने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लॉन्च केला होता, ज्यामध्ये क्वाड कॅमेरा सेटअप आणि मागील बाजूस 5000mAh बॅटरी देण्यात आली होती. चला जाणून घेऊया Samsung Galaxy M33 5G स्मार्टफोनबद्दल…
Samsung Galaxy M33 ची संभाव्य फिचर्स – तज्ञांच्या मते, Samsung Galaxy M33 स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरी आढळू शकते. दुसरीकडे, सॅमसंग आपली आक्रमक किंमत ठेवू शकते जी सुमारे २० हजार रुपये असेल. सॅमसंगने 2019 मध्ये पहिल्यांदा एम सीरीजचा स्मार्टफोन लॉन्च केला होता, जो ग्राहकांना खूप आवडला होता.
जर आपण Samsung Galaxy M32 5G स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोललो, तर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत 16,999 रुपये आहे आणि त्याच्या 8 GB रॅम आणि 128GB स्टोरेज फोनची किंमत 18,999 रुपये आहे.
आणखी वाचा : Android १३ च्या फिचर्सवरून अखेर पडदा उठला; वॉलपेपर इफेक्ट, मीडिया कंट्रोल आणि बरंच काही…
Samsung Galaxy M33 चे संभाव्य स्पेसिफिकेशन – Samsung Galaxy M33 5G स्मार्टफोन 1080×2408 पिक्सेलच्या रिझोल्यूशनसह 6.6-इंचाचा FHD + डिस्प्ले देऊ शकतो आणि 120Hz रीफ्रेश रेट देऊ शकतो.
याशिवाय या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर एक्सीनोस 1280 चिपसेट उपलब्ध असेल, या स्मार्टफोनची स्टोरेज मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 1 टीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. त्याच्या ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे तर, सॅमसंग त्यात Android 12 ऑपरेटिंग सिस्टम देऊ शकते आणि त्याची बॅटरी 6000mAh असेल जी 25w फास्ट चार्जरला सपोर्ट करेल.