Samsung ही एक लोकप्रिय मोबाइल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन स्मार्टफोन लॉन्च करत असते. सॅमसंग या आठवड्याच्या अखेरीस आपल्या M सिरीजमधील आपला नवीन Galaxy M34 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च करणार आहे. कंपनीने आधीच या डिव्हाईसची एक झलक शेअर केली आहे. फोनच्या मागच्या बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल आणि मुख्य कॅमेरा सेन्सरमध्ये व्हिडिओसाठी OIS सपोर्ट असण्याची शक्यता आहे. तसेच सॅमसंगच्या Galaxy M34 5G या स्मार्टफोनमध्ये १२० Hz चा डिस्प्ले आणि ६००० mAh क्षमतेची बॅटरीसह येईल. डिव्हाइसबद्दल इतर माहिती अजून उघड करण्यात आलेली नाही. हा स्मार्टफोन ७ जुलै रोजी लॉन्च होण्याची शक्यता आहे.

Samsung Galaxy M34 5G ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स (लीक)

विश्वसनीय लीकस्टर योगेश ब्रार यांच्या मते, आगामी सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये ६.५इंचाचा फुल एचडी AMOLED डिस्प्ले मिळणार आहे. हे सॅमसंगच्या इन-हाऊस चिप, Exynos 1280 द्वारे समर्थित असेल. तसेच यात जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज असेल. तथापि, काही बातम्यांमध्ये असे सांगण्यात आले होते की, सॅमसंग यावेळी MediaTek Dimensity 1080 चिपसेटची निवड करू शकते. याबाबतचे वृत्त India Today ने दिले आहे.

Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Shah Rukh Khan Rejected Karan Arjun
‘या’ कारणामुळे शाहरुख खानने ‘करण अर्जुन’ करायला दिला होता नकार, आमिर खानची लागली होती वर्णी, पण…
Bengaluru man kills son Over mobile
‘तू मेलास तरी फरक पडत नाही’, मोबाइलचं व्यसन जडलेल्या लहान मुलाचा वडिलांनीच केला निर्घृण खून
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
Kal Ho Naa Ho Re-Release
२१ वर्षांनंतर पुन्हा रिलीज होणार शाहरुख खान-प्रीती झिंटाचा ‘हा’ ब्लॉकबस्टर चित्रपट; गाण्यांनी प्रेक्षकांना लावलेलं वेड

हेही वाचा : Weekly Tech Updates: प्रसिद्ध कंपनीच्या कर्मचारी कपातीच्या निर्णयापासून ते Google ने केलेल्या AI टूल्सच्या घोषणेपर्यंत; टेक क्षेत्रातील ‘या’ महत्त्वाच्या घडामोडी

तसेच ब्रार यांचा दावा आहे की, या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये ५० मेगापिक्सल, ८ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सलचे सेन्सर असतील. ब्रार यांच्या ट्विटनुसार, यामध्ये सेल्फी आणि व्हिडिओसाठी १३ मेगापिक्सलचा कॅमेरा असेल. हे डिव्हाईस अँड्रॉइड १३ वर चालेल. तसेच 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला देखील समर्थन देईल अशी अपेक्षा आहे. या फोनला २५ W चार्जिंगला सपोर्ट करेल असे ब्रार म्हणाले.

काय असू शकते किंमत ?

सॅमसंग Galaxy M34 5Gच्या किंमतीबद्दल ब्रार म्हणतात की,याफोनची किंमत १८ते १९ हजार रुपयांदरम्यान असेल. तथापि किंमतींबद्दल अद्याप खात्री नसून या किंमतीमध्ये फोन ऑफर करण्यात आला आहे की नाही ते लॉन्चिंग इव्हेंट दरम्यान कळू शकेल. आणखी एक टिपस्टर ईशान अग्रवाल म्हणतात की, भारतात या फोनची किंमत २१ ते २४ हजार रुपयांदरम्यान असेल. तसे हा फोन ६ आणि ८ जीबी रॅममध्ये लॉन्च होईल असेही ते म्हणाले.

सॅमसंग Galaxy M सिरीज प्रामुख्याने प्रभावी फीचर्स असतील असा बजेट स्मार्टफोन शोधत असलेल्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करते. विश्वास, जास्त काळ टिकणारी बॅटरी आणि चांगला डिस्प्ले अशा काही फीचर्समुळे सिरीजमुळे लोकप्रियता मिळवली. या सिरीजमधील नवीन स्मार्टफोन Galaxy M33 हा होता. जो मागच्या वर्षी लॉन्च झाला होता. Samsung Galaxy M33 ची किंमत १८,९९९ रुपयांपासून सुरू होते.